२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २० वर्षीय तरुणीवर प्रियकराने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत घडली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नासाठी दबाव टाकत असल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतली. त्यावरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी प्रियकराविरुद्ध शुक्रवारी (१६ जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे.

नितीन ज्ञानेश्वर पायगव्हाण (वय २४, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२६ या काळात हा गुन्हा घडल्याचे तक्रारीवरून समोर येते. तक्रारदार तरुणी यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तक्रारीनुसार, २०२३ मध्ये ती वाळूज एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरीला होती. कंपनीतच सुपरवायझर असलेल्या नितीनसोबत तिची ओळख वाढल्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नितीनने ऑगस्ट २०२४ मध्ये तिला रांजणगाव शेणपुंजीतील शिवनेरी कॉलनीमधील आपल्या घरी राहायला आणले.

तिथे दोघे राहत असताना त्याने वारंवार तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली. दारू पिऊन मारहाण करत लग्नासाठी हट्ट करायचा. तिने त्याच्यासोबत लग्नाला नकार दिल्याने त्याने ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तिला खोलीत कोंडून ठेवल्याचाही आरोप तरुणीने केला आहे. संधी साधून ३ ऑगस्टला तरुणीने तिथून पळ काढला आणि ४ ऑगस्टला यवतमाळला घरी आली. त्यानंतर नितीनने कॉल करून तिला फोटो व्हायरल करण्यासह खुनाची धमकी दिली, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने लोहारा पोलीस ठाण्यात नितीनविरुद्ध तक्रार दिली. मात्र घटना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने गुन्हा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडे वर्ग होऊन तपासासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software