पत्नी, मुलीला शोधून द्या होऽऽ... २ महिन्यांपासून पती मारतोय सातारा पोलिसांत चकरा, पोलिसांचे एकच उत्तर : ‘तपास सुरू आहे’; पतीला ‘या’ लोकांवर संशय!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हमालवाडा येथून २७ वर्षीय विवाहिता आणि तिची ४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्या आहेत. ३१ जुलैला त्‍या दोघीही गायब झाल्या, त्यानंतर बराच शोध घेऊन अखेर पतीने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर २ महिने उलटले, तरी पोलिसांनी मायलेकीचा शोध लावलेला नाही. तपास सुरू आहे, असे एकमेव उत्तर दिले जाते. विशेष म्‍हणजे, पतीने पत्नी आणि मुलीला बेपत्ता करण्यात सासरच्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे, तरीही त्यादृष्टीने तपास केला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लक्ष्मी अशोक चंदनशिव (वय २७) आणि त्यांची मुलगी प्रगती (वय ४, मूळ रा. खुपटा, ता. सिल्लोड, ह. मु. अमृतसाई प्लाझाजवळ, हमालवाडा, सातारा परिसर) अशी बेपत्ता मायलेकीची नावे आहेत. लक्ष्मी यांचे वर्णन रंग गोरा, मध्यम बांधा, उंची ५ फूट ५ इंच, अंगात गुलाबी साडी, सोबत ४ वर्षांची मुलगी असे आहे. कुणाला ती आढळल्यास सातारा पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेख यांनी केले आहे.

नक्की कसे घडले?
अशोक चंदनशिव यांनी मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राला लेखी कळवल्यानुसार, ३० जुलैला अशोक, लक्ष्मी आणि मुलगी प्रगती असे सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरला आले. दुसऱ्या दिवशी ३१ जुलैला दुपारी मुलीची प्रकृती ठीक नसल्याने लक्ष्मी ही पतीकडून ५०० रुपये घेऊन सिल्कमिल्क कॉलनीतील दवाखान्यात गेली. अशोक हे बुलडाणा अर्बन बँकेत काम असल्याने सिडकोला गेले. ते घरी आले असता पत्नी लक्ष्मी आणि मुलगी प्रगती दोघेही घरी नव्हते. दवाखान्याची चिठ्ठी मात्र लक्ष्मीने घरात टाकलेली होती.

पतीचा संशय सासरच्यांवर...
पत्नी लक्ष्मी आणि मुलीला सासू मंडाबाई धाकतोडे, लक्ष्मीच्या बहिणी रेखाबाई अहिरे, मथुराबाई कांबळे, चतुराबाई चंदनशिव यांनी कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय पती अशोक यांना आहे. लक्ष्मी आणि प्रगती बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे वागणे संशयास्पद असून, विचारणा केल्यावर त्यांनी आम्हाला माहिती नाही, असे उत्तर देतात. पोलिसांकडून तपासात टाळाटाळ सुरू आहे. सासरच्या मंडळींचे पत्नी आणि मुलीला बेपत्ता करण्यामागे कारस्थान असल्याचा संशय अशोक यांनी व्यक्‍त केला आहे.

सातारा पोलिसांकडून तपासात चालढकल...
दोन महिलेने उलटूनही पोलीस या तपासात काहीही निष्कर्ष काढू शकले नाहीत, की त्यांनी मायलेकीचा शोध लावण्यात स्वारस्य दाखवल्याचे दिसत नाही. त्‍यामुळे एकूण पोलीसही या प्रकरणात संशयाच्या घेऱ्यात आहेत. पोलिसांनी लक्ष्मीच्या माहेरच्यांची चौकशी केल्यास सत्य समोर येऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software