- News
- सिटी क्राईम
- HP गॅस सिलिंडरचा ट्रक गायब करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या!; ६० सिलिंडर टाक्याही जप्त, नारेगावमध्...
HP गॅस सिलिंडरचा ट्रक गायब करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या!; ६० सिलिंडर टाक्याही जप्त, नारेगावमध्ये घडलेल्या घटनेचा शहर गुन्हे शाखेने केला उगलडा!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नारेगाव येथील एचपी गॅस कंपनीतून गॅस सिलिंडर भरलेला ट्रक चोरट्यांनी २३ डिसेंबरला रात्री लंपास केला होता. हा ट्रक नंतर बीड बायपासवर आढळला. मात्र त्यातील ६२ गॅस सिलिंडर गायब होते. शहर गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळवले असून, तिघांना अटक करून सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून ६० सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
सुंदर आसाराम मुंढे (वय ३८, रा. श्री अपूर्वम सोसायटी, पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर) यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. ते HPCL गॅस कंपनी नारेगाव येथे सोमनाथ बाळासाहेब ढाकणे यांच्या मालकीची ट्रक (MH 44 U 2309) चालवतात. २३ डिसेंबरला सायंकाळी पावणेसातला HPCL गॅस कंपनी नारेगाव येथून HP गॅसने भरलेल्या १४ किलो गॅसचे ३४० सिलिंडर व ५ किलो गॅसचे ४ सिलेंडर असे एकूण ३४४ सिलिंडर ट्रकमध्ये लोड करून ट्रक नारेगाव रोडवर टँकर पार्किंगसमोर उभा केला. रात्री १० च्या सुमारास ट्रकचे दरवाजे बंद करून चावी गाडीमध्येच ठेवून ते घरी पिसादेवीला आले. त्यानंतर २४ डिसेंबरला सकाळी सव्वा आठला गाडी खाली करायची असल्याने ते ट्रक उभा केलेल्या ठिकाणी आले असता ट्रक दिसला नाही. त्यांनी ट्रकचा शोध घेतला असता झाल्टा फाटा बीड बायपास येथे रोडच्या बाजूला उभा केलेला दिसला. गॅस सिलिंडर तपासले असता त्यामध्ये ६२ गॅस सिलिंडर कमी असल्याचे दिसून आले. १ लाख १४ हजार ७०० रुपयांचे ६२ गॅस सिलिंडर चोरट्याने लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी विजय पवारला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्याने साथीदारासह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेले ५० गॅस सिलिंडर जगदीश पटेल व १० सिलिंडर अक्षय सोळुंकेला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेचच घोडेगाव व मूर्तिजापूर येथून अशा एकूण ६० सिलिंडर टाक्या जप्त केल्या. तिघांनाही पकडून सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रविण वाघ, पोलीस अंमलदार योगेश नवसारे, विजय निकम, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, राऊत, सपकाळ, महिला पोलीस अंमलदार श्रीमती माळी, श्रीमती तुपे, चालक पोलीस अंमलदार सोमनाथ दुकले यांनी केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 22:13:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...

