तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रभाग १५ अ मधून भाजपचे उमेदवार असलेले बंटी चावरिया यांना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन खैरे यांनी पराभूत केले. मात्र बंटी चावरिया यांच्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप करत दुसऱ्या एका उमेदवाराने बंटी चावरिया यांच्या घरावर टोळक्यासह येऊन सशस्त्र हल्ला चढवला. दगडफेक केली. घरासमोरील ३ वाहनांची तोडफोड केली. हा थरार आज, १७ जानेवारीला पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) क्रांती चौक परिसरातील गांधीनगरात घडला.

क्रांती चौक पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचे उमेदवार मिल्लू कैलास चावरिया, दिनेश जयपाल चावरिया उर्फ कांटो, संदीप मदन कागडा, अक्षय चावरिया, रोहित हिवराळे, साहिल चावरिया, अमन सुभाष चावरिया, रोहित शहानंद चावरिया, रोहित संजय चावरिया, अमित चावरिया, अमित लव्हेरा, प्रेम नितनवरे, निखिल चावरिया व राहुल (मोठे केसवाला) (सर्व रा.  गांधीनगर) अशा १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विकी राजू चावरिया (वय ३६, रा. गांधीनगर शहा किराणाजवळ छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, आज, १७ जानेवारीला पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) विकी व बंटी चावरिया हे घरात मनपा निवडणुकीसंदर्भात बोलत बसले होते.

जोरजोराने शिवीगाळीचा आवाज आल्याने दोघे बाहेर आले, तेव्हा मिल्लू चावरिया हा साथीदारांसह आला. त्यांच्या हातात चाकू, दगड, लाठ्या-काठ्या, लोखंडी पाईप होते. त्यांनी विकी व बंटी चावरिया यांच्यावर हल्ला केला. तुमच्यामुळे आम्ही निवडणूक हरलो, असे म्हणून त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. बंटी आणि विकी तुम्हा दोघांना भावांना जीवे मारून टाकू, तुम्हाला म्हटलं होतं, की आमच्याविरोधात निवडणूक लढू नका... अशी धमकी देत शिवीगाळ करत त्यांनी घरासमोर लावलेल्या गाड्या एक अॅक्टीव्हा (MH 20 EA 71642)), दोन मोटारसायकली (MH 20- 01493, MH 20 BX 88984), एक बुलेट (MH 20 GR 8767) या गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.

घराशेजारी राहणाऱ्या निर्मला महेंद्र गागट यांच्याही घरावर दगडफेक केली. त्यांच्या घराच्या खिडकीची काच फुटून त्यांच्या हाताच्या कोपऱ्यावर मार लागला. त्यांनी लावलेले दोन्ही CCTV कॅमेरे तोडले व जाताजाता म्हणाले, की "तुमच्या मुलानेही बंटी चावरियाचा प्रचार केला. तुम्हालाही पाहून घेऊ’, असे म्हणून सर्वजण पुढे गेल्यानंतर रस्त्यात धरमवीर सुरजमल लाहोट यांचे घर दिसल्याने, तो सुध्दा बीजेपीचा कार्यकर्ता असल्याने त्यालाही शिवीगाळ करून यानेही बंटी चावरिया यांचा प्रचार केला. यालाही सरळ करू, अशी धमकी दिनेश जयपाल चावरिया उर्फ कांटो याने दिली. त्यांच्या हातात चाकू, लोखंडी पाईप, गज, लाठ्या-काठ्या होत्या, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software