- News
- सिटी क्राईम
- दोनदा धिंड काढल्याने अपमानामुळे टिप्याचे मानसिक संतुलन बिघडले, हर्सूल कारागृहात डांबताना पुन्हा पोलि...
दोनदा धिंड काढल्याने अपमानामुळे टिप्याचे मानसिक संतुलन बिघडले, हर्सूल कारागृहात डांबताना पुन्हा पोलिसांवर हल्ला !
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बाजारपेठेतून पोलिसांनी दोनदा धिंड काढली. लोक हसले. त्यामुळे कुख्यात गुन्हेगार टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख याची पुरती इज्जत गेली, दहशत संपली. पोलिसांचं लोकांनी कौतुक केलं. अपमान असह्य झालेल्या टिप्याचे मानसिक संतुलन हरवले आहे. यातूनच त्याने पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला केला. कोर्टात तारखेला हजर करून कारागृहात सोडताना सोमवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता हा प्रकार घडला. त्याच्याविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्या अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात आहे. पूर्वी तो पोलिसांना गुन्ह्याविषयी माहिती देत असायचा. म्हणजेच खबऱ्या म्हणून काम करायचा. गुन्हे करता करता पोलिसांना इतर गुन्हेगारांची टिपही देत होता. टिप्याकडून पोलिसांना गुन्ह्यांची माहिती मिळत असे म्हणून त्याच्या गुन्ह्यांकडे पोलिसांनीही सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष केले. बघता बघता टिप्या अट्टल गुन्हेगार झाला. नंतरच्या काळात टिप्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. त्याच्याविरुद्ध लुटमार, खंडणी, दंगल, विनयभंग, पोलिसांवर हल्ला असे २५ हून गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारागृहाबाहेर पडताच त्याची गुन्ह्यांची मालिका सुरू होते. त्याला व त्याच्या टोळीला काही अवैध व्यावसायिकांनी पोसले होते. टिप्या विजयनगरात राहतो. त्याची विजयनगर, पुंडलिकनगर परिसरात दहशत आहे. काही वर्षांपूर्वीही कारागृहाबाहेर पडल्यानंतर पुंडलिकनगर रस्त्यावर मैत्रिणीच्या वाढदिवसाचे त्याने सेलिब्रेशन केले होते, ज्याची पूर्ण शहरात चर्चा झाली होती. हातात बिअरची बाटली, सिगारेट घेऊन तो मैत्रिणीसोबत कारवर नाचला होता. त्यावेळी त्याची ही मैत्रिण पुणे जिल्ह्यातील तत्कालिन डीवायएसपींची मुलगी असल्याचे समोर आले होते. टिप्याविरुद्ध ४ जणांच्या खुनाचे आरोप आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये दुचाकीला साईड न दिल्याच्या कारणावरून त्याने चाकूने भोसकून एकाची हत्या केली होती. एका पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. तो स्वतःला संभाजीनगरचा किंग म्हणवतो. त्याचे साथीदार त्याचे व्हिडीओ तयार करतात. टिप्याने हातावरही मौत असे गोंदवून ठेवले आहे. त्याच्या मोबाइलच्या क्रमांकाचेही शेवटचे आकडे ३०२ असतात, एवढेच नाही तर त्याच्या गाडीचा क्रमांकही ३०२ आणि गाडीसमोर मौत असे लिहिलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 06:29:14
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिल्लोड तालुक्यातील नानेगाव-जंजाळा रस्त्यावरील गट क्र....

