२६ वर्षीय विवाहितेचा छळ, पती, सासूविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूज MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय विवाहितेचा माहेरावरून ५ लाख रुपये आण म्‍हणून पती व सासूने शारीरिक व मानसिक छळ केला. घरातून हाकलून दिले. विवाहितेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिच्या पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंजली राहुल शिरसंगे (वय २६, रा. वारजे आदित्य गार्डन, सिटी घरकुल वस्ती छत्रपती शाहू महाराज कॉलनी पुणे, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय विवाहितेचा माहेरावरून ५ लाख रुपये आण म्‍हणून पती व सासूने शारीरिक व मानसिक छळ केला. घरातून हाकलून दिले. विवाहितेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तिच्या पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अंजली राहुल शिरसंगे (वय २६, रा. वारजे आदित्य गार्डन, सिटी घरकुल वस्ती छत्रपती शाहू महाराज कॉलनी पुणे, ह. मु. कदमवस्ती पंढरपूर, वाळूज) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांचा दोन वर्षांचा मुलगा आहे. त्‍यांचे लग्‍न २८ फेब्रुवारी २०२१ रोजी राहुल झाले. शिरसंगे याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर ती पुण्यात राहण्यास गेली. काही दिवस सासरच्या लोकांनी तिला चांगले नांदवले. नंतर २३ मे २०२३ पासून सासरचे लोक घर घेण्यासाठी माहेरावरून पैसे आण म्हणून मागणी करून लागले. लग्नाअगोदर सांगण्यात आले होते की, मुलाचे स्वतःचे घर आहे. परंतु तेथे गेल्यानंतर समजले की, घर स्वतःचे नसून ते किरायाने राहत होते.

सासूच्या मागणीप्रमाणे घर घेण्यासाठी मदत म्हणून तिच्या आई-वडिलांनी १ लाख रुपये दिले. त्यानंतर सासरच्यांनी माहेरहून आणखी ५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करायला सुरुवात केली. या दरम्यान तिला पतीपासून दिवस गेले. चौथा महिना लागलेला असताना पतीने तिला माहेरी पाठवून दिले. १० नोव्‍हेंबर २०२३ रोजी तिला मुलगा झाला. त्यानंतर पती व सासू म्हणाले, की तू जोपर्यंत आम्हाला घर खरेदी करण्याकरिता ५ लाख रुपये आणून देत नाही तोपर्यंत आम्ही तुला नांदवणार नाही. पतीसोबत संसार करत असताना पतीने बरेच वेळा पैशांसाठी मारहाण केली. सासूने शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन पती राहुल ऊर्फ हेमंत बाळू शिरसंगे, सासू संगीता बाबु शिरसंगे यांनी घराबाहेर हाकलून दिले, असे तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशव चौथे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software