१२, १६ वर्षांच्या मुलींचे अपहरण, सातारा परिसरातील घटना, चुलत नणंद, लेक गायब झाल्याने महिलेची पोलिसांत धाव

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १६ वर्षीय लेक आणि १२ वर्षीय चुलत नणंदेचे अपहरण झाल्याची तक्रार ४० वर्षीय महिलेने सातारा पोलीस ठाण्यात सोमवारी (२६ ऑगस्ट) दिली. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून दोन्ही मुलींचा शोध सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील गंगापूर नेहरी पाटोदा येथे ही घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, त्या पती, दोन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १६ वर्षीय लेक आणि १२ वर्षीय चुलत नणंदेचे अपहरण झाल्याची तक्रार ४० वर्षीय महिलेने सातारा पोलीस ठाण्यात सोमवारी (२६ ऑगस्ट) दिली. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून दोन्ही मुलींचा शोध सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील गंगापूर नेहरी पाटोदा येथे ही घटना समोर आली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, त्या पती, दोन मुले आणि दोन मुलींसोबत राहतात. मुलगी आणि चुलत नणंद बकऱ्या घेऊन शेताकडे चारण्यास घेऊन गेल्या. २५ ऑगस्टला सकाळी १० च्या सुमारास त्या गेल्या. त्यांच्यासोबत दोन्ही मुलेही गेली होती. मात्र मुली व दोन्ही मुलांचे आपसात वाद झाल्याने दोन्ही मुले दुपारी १२ लाच बकऱ्या घेऊन घराकडे आले. मुलगी व चुलत नणंद आल्या नाहीत. त्‍यामुळे दोन्ही मुलींचा शोध घेण्यात आला. शेताकडे, घराजवळच्या मंदिरात, आजूबाजूला, त्यांच्या मैत्रिणींकडे, नातेवाईकांककडे तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. दोघी अल्पवयीन असल्याने त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा संशय असल्याचे महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निर्मला राख करत आहेत. (सूचना : बातमीतील छायाचित्र प्रतिकात्‍मक आहे.)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software