हिट ॲन्ड रन… भरधाव कारने बहीण-भावाला चिरडले; बजाजनगरातील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मागून भरधाव आलेल्या कारने बहीण-भावाला धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर कारचालक वेगाने पसार झाला. ही घटना सोमवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास बजाजनगरात घडली. क्रिश किशोर राठोड (वय १९), नेहा राठोड (वय २१, दोघेही रा. साई मंदिराजवळ, बजाजनगर) अशी जखमींची नावे आहेत. क्रिश व नेहा सोमवारी सायंकाळी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मागून भरधाव आलेल्या कारने बहीण-भावाला धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर कारचालक वेगाने पसार झाला. ही घटना सोमवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास बजाजनगरात घडली. क्रिश किशोर राठोड (वय १९), नेहा राठोड (वय २१, दोघेही रा. साई मंदिराजवळ, बजाजनगर) अशी जखमींची नावे आहेत.

क्रिश व नेहा सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी शनि मंदिरासमोरील रस्त्याने जात होते. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच २० एफजी ८२७२) दोघांना मागून जोरात धडक दिली. यात नेहाच्या पोटावरून कारचे चाक गेले. ती गंभीर जखमी झाली तर क्रिशच्या उजव्या हाताला व कमरेला जबर दुखापत झाली आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी फरारी कारचालक ऋषिकेश भगवान औटी (२४, रा. बजाजनगर) याच्याविरुद्ध क्रिशच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेश तारव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software