हातात नंगी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या २ गुंडांच्या आवळल्या मुसक्या!; मुकुंदवाडी बसथांब्यावरील थरार… (व्हिडीओसह)

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडी बसथांबा आणि एपीआय कॉर्नर येथे हातात नंगी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांच्या मुसक्या मुकुंदवाडी पोलिसांनी आवळल्या. जिवावर उदार होऊन पोलिसांनी अत्‍यंत शिताफीने दोघांना पकडले. रोहित रमेश मोरे (वय २२), विशाल संजय खरात (वय २०) अशी या गुंडांची नावे आहेत. त्‍यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार सुजल शर्मा यांनी तक्रार दिली. त्‍यावरून […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडी बसथांबा आणि एपीआय कॉर्नर येथे हातात नंगी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन गुंडांच्या मुसक्या मुकुंदवाडी पोलिसांनी आवळल्या. जिवावर उदार होऊन पोलिसांनी अत्‍यंत शिताफीने दोघांना पकडले.

रोहित रमेश मोरे (वय २२), विशाल संजय खरात (वय २०) अशी या गुंडांची नावे आहेत. त्‍यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार सुजल शर्मा यांनी तक्रार दिली. त्‍यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रोहित आणि विशाल हे गावगुंड २३ जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास एपीआय कॉर्नर व मुकुंदवाडी बसस्टॉप येथील गल्लीत हातात तलवार घेऊन दहशत माजवत होते. ही माहिती सतर्क नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिसांना दिली. लगेचच त्‍या ठिकाणी पोलीस अंमलदार सुजल शर्मा आणि नीलेश पाटेकर दाखल झाले. जिवावर उदार होऊन त्‍यांनी दोघांनाही ताब्‍यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे व सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दोन्ही संशयितांकडून ४ ते ५ इंच पाते असलेली व १९ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software