- News
- सिटी क्राईम
- ‘समृद्धी’वर भाईगिरीची रील; १६ टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल, ५ जणांच्या मुसक्या आवळल्या!, शहर गुन्हे
‘समृद्धी’वर भाईगिरीची रील; १६ टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल, ५ जणांच्या मुसक्या आवळल्या!, शहर गुन्हे शाखेची कारवाई
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माळीवाड्याजवळ समृद्धी महामार्गावर वाहने उभी करून १६ टवाळखोरांनी हातात बंदुकी घेऊन रील तयार केली. पोलिसांपर्यंत ही रील पोहोचताच १२ तासांत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. पाच जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. मंगळवारी (१६ जुलै) गुन्हे शाखेने जिन्सी भागात ही कारवाई केली. शेख हमीद शेख हबीब, शेख अफताब शेख कादर, शेख आश्पाक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माळीवाड्याजवळ समृद्धी महामार्गावर वाहने उभी करून १६ टवाळखोरांनी हातात बंदुकी घेऊन रील तयार केली. पोलिसांपर्यंत ही रील पोहोचताच १२ तासांत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. पाच जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. मंगळवारी (१६ जुलै) गुन्हे शाखेने जिन्सी भागात ही कारवाई केली.
पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार असल्याची कुणकुण हमीदला लागताच त्याने त्याच्याकडील दोन्ही पिस्तुले लपवली आहेत. पिस्तुलासह त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी सांगितले.
दोघे अट्टल गुन्हेगार…
हमीदचे इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाइड असून, १ लाखाच्या घरात त्याचे फॉलोअर्स आहेत. यापूर्वी सिटी चौक, क्रांती चौक व सिडको पोलीस ठाण्यात मारहाणीचे तीन गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. आशपाकही गुन्हेगार असून, दौलताबाद पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Mar 2026 21:38:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....

