शाळेतून घरी परतणाऱ्या आठवीतील मुलीची टवाळखोराने काढली छेड!; ये चिठ्ठी ले, मोबाइल नंबर दे…म्‍हणत लगट करण्याचा प्रयत्‍न, कटकट गेट भागातील संतापजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शाळेतून घरी परतणाऱ्या आठवीतील मुलीची भररस्त्यात टवाळखोराने छेड काढली. ये चिठ्ठी ले और मोबाइल नंबर दे असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना शुक्रवारी (२३ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास कटकट गेट भागात घडली. शेख दानिश शेख जावेद (रा. किराडपुरा) असे या टवाळखोराचे नाव असून, जिन्सी पोलिसांनी त्‍याला अटक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शाळेतून घरी परतणाऱ्या आठवीतील मुलीची भररस्त्यात टवाळखोराने छेड काढली. ये चिठ्ठी ले और मोबाइल नंबर दे असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना शुक्रवारी (२३ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास कटकट गेट भागात घडली. शेख दानिश शेख जावेद (रा. किराडपुरा) असे या टवाळखोराचे नाव असून, जिन्सी पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

जिन्सी परिसरातील १५ वर्षीय विद्यार्थिनीचा ३ दिवसांपासून दानिश शाळा सुटल्यानंतर पाठलाग करायचा. शुक्रवारी दुपारी साडेबाराला ती शाळेतून घरी येत होती. दानिशने तिचा पाठलाग केला. कटकट गेट भागात तिला गाठून चिठ्ठी दिली व मोबाइल क्रमांक मागितला. त्यामुळे मुलगी घाबरून गेली. तिने तिथून पळ काढत घर गाठले. पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यावर त्‍यांनी तिला घेऊन जिन्सी पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांना कळताच त्‍यांनी जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांना तत्‍काळ कारवाईच्या सूचना केल्या.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून दानिशचा शोध सुरू केला. तो बेकरीत काम करत असल्याचे कळताच तिथे जाऊन त्‍याला अटक केली. त्‍याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे अधिक तपास करत आहेत. वाढत्‍या लैंगिक अत्‍याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस विभाग अधिक सतर्क झाला असून, अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत ओहत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सर्व ठाणे प्रभारींची बैठक घेऊन सूचना केल्या. महिला, अल्पवयीन मुलींच्या तक्रारीत हयगय करू नका, सखोल तपास करा, अशा सूचना केल्या.

पंचवटी चौकातील घटनेचा रिक्षाचालक सापडेना…
पॉलिटेक्निकच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीसमोर चालत्या रिक्षात चालकाने पँट काढून अश्लील कृत्य केल्याची घटना पंचवटी चौकात शुक्रवारी सकाळी घडली होती. त्‍या घटनेतील संशयित रिक्षाचालकाचा शोध अद्याप लागलेला नाही. वेदांतनगर पोलीस शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते.

महाविद्यालयीन तरुणीचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल…
वैजापूर शहरातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्या तिघांविरुद्ध शुक्रवारी (२३ ऑगस्ट) वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली होती. अजित त्रिभुवन, हुसेन सय्यद (दोघे, रा. वैजापूर) व वैभव थोरात (रा. विरगाव) अशी संशयितांची नावे आहेत. तिघांनी तिचे आक्षेपार्ह फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप आहे. तिचा पाठलाग करून तिचे आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकी त्यांनी तरुणीला दिली. मुलीच्या काकाने वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software