वाळूज एमआयडीसीत चोरट्यांचा ‘हैदोस!’; ८ दुकाने फोडली, २ कारची चोरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीस चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, रात्रीतून ८ दुकाने फोडण्यास २ कार चोरीला गेल्या आहेत. तिसऱ्या कारची चोरी थोडक्‍यात फसली. या घटना बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले. कमळापूर-वाळूज मार्ग गजबजलेला असतो. रात्रभर या मार्गावर वर्दळ असते. तरीही चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्‍त होत […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीस चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून, रात्रीतून ८ दुकाने फोडण्यास २ कार चोरीला गेल्या आहेत. तिसऱ्या कारची चोरी थोडक्‍यात फसली. या घटना बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले.

कमळापूर-वाळूज मार्ग गजबजलेला असतो. रात्रभर या मार्गावर वर्दळ असते. तरीही चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्‍त होत आहे. चोरट्यांनी मातोश्री कॉम्प्लेक्स येथील सोनू किराणा दुकान, यशश्री ट्रेडर्स, मराठवाडा ट्रेडर्स, आई क्लिनिक, तर प्रल्हाद कॉम्प्लेक्स येथील श्री नाथ इंटरप्रायजेस, रुख्मणी प्रोव्हिजन ॲण्ड जनरल स्टोअर्स, गुरुकृपा मेडिकल आणि साई गणेश मॉल ही आठ दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली.

साई गणेश मॉलचे शटर चोरट्यांनी उचकटले. परंतु शटरच्या आतील काचेचा दरवाजा लोखंड पाना, दगडांचा मारा करूनही काच फुटली नाही. आवाजाने दुकान मालकाला जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला. हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिगारेटचे पाच पाकिटे, रोख २ हजार रुपये एवढाच ऐवज ते नेऊ शकल्याने चोरटे भुरटे असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचा लवकरच शोध घेतला जाईल, असे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

२ कार नेल्या, तिसऱ्या कारची चोरी टळली…
सिडको वाळूज महानगरातील श्री स्वामी समर्थनगरातील रहिवासी संगीता कोटमे यांच्या नावावरील क्रेटा कार (एमएच २०, ईवाय ८७३३) अंगणात उभी असताना चोरट्यांनी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास अवघ्या दोन मिनिटांमध्ये दरवाजा उघडून स्टेअरिंग लॉक तोडून पळवली. याच मार्गावरील एएस क्लब परिसरातील तापडिया इस्टेट सोसायटीत राहणाऱ्या श्रीरंग शेळके यांच्या अंगणातील क्रेटा कारही (एमएच २०, एफजी ६९८८) अशीच चोरून नेली. चोरट्यांनी कार घेऊन धुळे-सोलापूर महामार्गाने पळ काढल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून दिसून येत आहे.

पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संजय गीते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस अंमलदार हनुमान ठोके, यशवंत गोबडे यांनी घटनस्थळी धाव घेऊ पंचनामा केला. श्रीरंग शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करत आहेत. गणेशनगर परिसरात उभी क्रेटा कारही चोरून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र परंतु कारचा दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात कारचा सायरन जोरात वाजण्यास सुरुवात झाल्याने घाबरून चोरट्यांनी पळ काढला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर...
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई : आ. विलास भुमरेंसोबत चिमुकल्याला मतदान कक्षात प्रवेश दिल्याने ३ कर्मचारी निलंबित!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software