वधूच्या आईची ६ तोळे दागिन्यांची पर्स लग्नातून लांबवली!; गरवारे स्टेडियमजवळील प्रेसिडेन्ट लॉन्समधील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गरवारे स्टेडियमजवळील प्रेसिडेन्ट लॉन्समध्ये लग्न सोहळ्यातून सहा तोळे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिमा संजय संगई (वय ५५, रा. आदिनाथनगर, गारखेडा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील नारेगाव रोडलगत गरवारे स्टेडियमजवळ प्रेसिडेन्ट लॉन्स आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गरवारे स्टेडियमजवळील प्रेसिडेन्ट लॉन्समध्ये लग्न सोहळ्यातून सहा तोळे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिमा संजय संगई (वय ५५, रा. आदिनाथनगर, गारखेडा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील नारेगाव रोडलगत गरवारे स्टेडियमजवळ प्रेसिडेन्ट लॉन्स आहे. तेथे ३० जूनला प्रतिमा यांच्या मुलीचा लग्न सोहळा होता. लग्नाची गडबड असल्यामुळे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र आणि तीन तोळ्यांचा नेकलेस असे सहा तोळे दागिने प्रतिमा यांनी पर्समध्ये ठेवून ती पर्स सांभाळण्यासाठी स्वःच्या आईकडे सांभाळायला दिली. मात्र चोरट्यांनी नजर चुकवून दागिन्यांची पर्स लंपास केली. पर्स गायब झाल्याने प्रतिमा यांनी शोधाशोध केली. मात्र पर्स मिळून आली नाही. ती कुणीतरी चोरल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software