लपाछपीचा ‘खेळ’ संपला : डॉ. प्रतीक्षा गवारे आत्‍महत्‍याप्रकरणी पती डॉ. प्रीतमच्या मुसक्या पडेगावमधून आवळल्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय एमबीबीएस डॉक्‍टर प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे हिला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती डॉ. प्रीतम शंकर गवारे याच्या मुसक्या आवळण्यात सिडको पोलिसांना अखेर आज, २८ ऑगस्टला यश आले. त्‍याला दुपारी पडेगावमधील सुंदरनगर भागातील त्‍याच्या नातेवाइकाच्या घरातून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी पत्रकारांना दिली. रशियाला पळून जाण्याचा त्‍याचा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २६ वर्षीय एमबीबीएस डॉक्‍टर प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे हिला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती डॉ. प्रीतम शंकर गवारे याच्या मुसक्या आवळण्यात सिडको पोलिसांना अखेर आज, २८ ऑगस्टला यश आले. त्‍याला दुपारी पडेगावमधील सुंदरनगर भागातील त्‍याच्या नातेवाइकाच्या घरातून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी पत्रकारांना दिली. रशियाला पळून जाण्याचा त्‍याचा प्लॅन होता. रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेतलेले असल्याने त्याच्याकडे रशियाचा व्हिसा आहे. याचाच फायदा उचलून तो कायमचा रशियाला जाणार होता, पण त्‍याआधीच पोलिसांनी जेरबंद केले.

सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांचे पथक प्रीतमचा शोध घेत होते. एमजीएममध्ये दाखल केल्यानंतर तिथे माहेरचे लोक आल्याने तो पळून गेला. तिथून करंजखेड्याला गेला. नंतर शेतात जाऊन लपला. तीन दिवस शेतात लपल्यावर मंगळवारी (२७ आॅगस्ट) पडेगावातील नातेवाइकाकडे आला. हे कळताच पोलिसांना त्याला पडेगावमध्ये जाऊन अटक केली. अटक केल्यावर त्‍याच्या चेहऱ्यावर केलेल्या कृत्‍याचा लवलेशही दिसून आला नाही. उलट प्रतीक्षाच चुकीची होती, असे तो पोलिसांना सांगत आहे. प्रतीक्षाच्या चारित्र्यावर तो अजूनही शिंतोडे उडवत होता. तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्‍याने पोलिसांना सांगितले. प्रीतम रशियातून एमबीबीएस झाला. परदेशात डॉक्‍टर झालेल्यांची भारतात परीक्षा घेतली जाते. नंतरच मेडिकल प्रॅक्‍टिसची परवानगी दिली जाते. ती परीक्षा तो नापास झाल्याने करंजखेड्यात सुपर शॉपी चालवत होता. त्याचे वडील माजी सैनिक असून, बहीणही डॉक्टर तर भाऊजी धाराशिवचे उपजिल्हाधिकारी आहेत. प्रतीक्षालाही स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ व्हायचे होते.

त्या दिवशी दोघांत कॉल्स, चॅटिंग…
२४ ऑगस्टला डॉ. प्रतीक्षाने आत्‍महत्‍या केली त्‍या दिवशी प्रीतम करंजखेडा (ता. कन्नड) येथे होता. सकाळपासून तो प्रतीक्षाशी वाद करत होता. तिला त्याने ८ कॉल केले होते, प्रतीक्षाचेही त्याला ४ कॉल होते. व्हाॅट्सअॅपवरही दोघांत चॅटिंग झाली. त्‍याचवेळी हा शेवटचा कॉल समज, असे म्हणून प्रतीक्षाने त्याला कॉल केला होता. प्लीज कॉल उचल असे म्हणत तिने मेसेज केले होते. पण प्रीतमने तिला रिप्लाय केला नाही.

काय म्‍हटलंय प्रतीक्षाच्‍या वडिलांनी तक्रारीत वाचा…
प्रीतमविरुद्ध प्रतीक्षाचे वडील ॲड. प्रकाश बाबुराव भुसारे (वय ५०, रा. तेहलसिंग हौसिंग सोसायटी, देवानगरी छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ते जिल्हा न्यायालयात वकिली करतात. प्रतीक्षाने २०२२-२३ मध्ये MBBS ची पदवी घेऊन MGM हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून १ ऑगस्टपासून रूजू झाली होती. तिचे लग्न २७ मार्च २०२४ रोजी नात्यातील मुलगा डॉ. प्रीतम शंकर गवारे (रा. करंजखेडा ता. कन्नड) याच्यासोबत हिंदूरितीरिवाजाप्रमाणे दीपक लॉन्स सावंगी छत्रपती संभाजीनगर येथे झाले होते. प्रीतमने रशिया येथून MBBS चे शिक्षण पूर्ण केले आहे. प्रतीक्षा लग्नापूर्वी करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. लग्नानंतर प्रतीक्षा तिचे पती, सासू, सासरे यांच्यासह सासरी करंजखेडा येथे राहत होती. तेव्हा प्रीतम हा प्रतीक्षा हिच्या मोबाईल क्रमांकावर येणारे फोन, मेसेज यावरून तिच्यासोबत वाद करून चारित्र्यावर संशय घेत होता. तो तिचा मोबाईल हँडसेट तपासत राहायचा. त्याच्या संशयी वृत्तीमुळे प्रीतमने तिच्या मोबाईलचा लॉकसुध्दा स्वतःचा फिंगरप्रिंट ठेवला होता.

प्रतीक्षा कामावर गेल्यावर तो सतत तिला फोन करायचा व फोन न घेतल्यास घरी आल्यावर शिवीगाळ करत होता. तिला तिचा मोबाईल हॅन्डसेट व मोबाईल क्रमांक बदलण्यास सांगत होता. प्रतीक्षा हिने वेळोवेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मोबाईल हँडसेट बदलण्यास थोडा वेळ मागितला. प्रतीक्षाच्या वडिलांनीही प्रीतमला समजावून सांगितले होते. मात्र त्याच्या वागणुकीत काही एक बदल झाला नाही. त्यानंतर प्रतीक्षा १ ऑगस्टपासून MGM हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथे राहणे गरजेचे होते. त्यावेळी प्रीतमने घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी केल्याने ॲड. भुसारे यांनी नातेवाईकाकडून १ लाख ६० हजार रुपये घेऊन प्रीतमच्या वडिलांना दिले. प्रतीक्षा आणि प्रीतम हे दोघे प्रफुल्ल हौसिंग सोसायटी एन ६ सिडको बजरंग चौक छत्रपती संभाजीनगर येथील चौधरी यांच्या घरात ५ ऑगस्टपासून किरायाने राहायला आले. प्रीतम सध्या काही एक व्यवसाय करत नव्हता. करंजखेडा येथे दवाखाना सुरू करण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पैसे आण, अशी मागणी तो करत होता. रक्षाबंधन सणानंतर प्रतीक्षा घरी पतीकडे गेली होती. २४ ऑगस्टला प्रतीक्षाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. प्रतीक्षाच्या अंत्यविधीवेळीही प्रीतम किंवा सासरकडील कुणीही मंडळी नव्हती.

हेही वाचा : डॉक्‍टर तरुणीने आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या चिठ्ठीतील मजकूर CSCN च्या हाती; चारित्र्य महिलेचा सर्वात मोठा दागिना असतो अन्‌ तुम्ही नेहमी त्यावरच चिखल फेकला…!…. प्रतीक्षाच्या भावनांचा कोंडमारा चिठ्ठीत व्यक्‍त…मला टाईट हग करूनच चितेवर ठेवा…, फरारी पती आलाच नाही…

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software