मिटमिटा रोडवर टीनू री ढाणी हॉटेलचालकाला लुटले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दौलताबाद येथील टीनू री ढाणी हॉटेलचालकाला लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी (१ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास मिटमिटा रोडवरील ईमानदार धाब्‍याजवळ घडली. मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी त्‍यांना अडवून मोबाइल व खिशातील २२ हजार रुपये हिसकावून घेत पळ काढला. भागवत माणिकराव डबले (वय ४४, रा. गुलमंडी सिटी मॉल, फ्‍लॅट नं. ४२) असे लुटले गेलेल्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दौलताबाद येथील टीनू री ढाणी हॉटेलचालकाला लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी (१ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास मिटमिटा रोडवरील ईमानदार धाब्‍याजवळ घडली. मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी त्‍यांना अडवून मोबाइल व खिशातील २२ हजार रुपये हिसकावून घेत पळ काढला.

भागवत माणिकराव डबले (वय ४४, रा. गुलमंडी सिटी मॉल, फ्‍लॅट नं. ४२) असे लुटले गेलेल्या हॉटेलमालकाचे नाव आहे. ते हॉटेलमधून घरी परतत असताना मोटारसायकलीवरील दोघांनी त्‍यांची मोटारसायकल आधी रस्त्याने दाबली. मोटारसायकल घसरण्याची शक्‍यता असल्याने डबले थांबले असता दोघांनी त्‍यांना चाकूचा धाक दाखवून लुटले. छावणी पोलिसांनी दोघा लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संजय रोकडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software