मद्यधुंद अवस्थेत कार सुसाट… अभियंत्‍यासह दोन प्रतिष्ठितांना हर्सूलजवळ पोलिसांनी पकडले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट निघालेली कार काहीतरी कांड करणार अशी शक्‍यता निर्माण झाली होती… हे पाहून बेगमपुरा पोलिसांनी जिवावर उदार होत कार थांबवली. कारमधील तिघेही मद्यधुंद होते. यात एका अभियंत्‍यासह दोन प्रतिष्ठितांचा समावेश होता. तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नीलेश गंगाधर ठाकरे (वय ४०, रा. तुळजाभवानी चौक, हर्सूल परिसर), इंजिनिअर नितीन विठ्ठल […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट निघालेली कार काहीतरी कांड करणार अशी शक्‍यता निर्माण झाली होती… हे पाहून बेगमपुरा पोलिसांनी जिवावर उदार होत कार थांबवली. कारमधील तिघेही मद्यधुंद होते. यात एका अभियंत्‍यासह दोन प्रतिष्ठितांचा समावेश होता. तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश गंगाधर ठाकरे (वय ४०, रा. तुळजाभवानी चौक, हर्सूल परिसर), इंजिनिअर नितीन विठ्ठल रत्‍नपारखे (वय ४३, रा. तेजल पार्क अपार्टमेंट, मयूर पार्क), प्रफुल्ल दिलीप नारखेडे (वय ३२१, रा. अंजनी पार्क पिसादेवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २५ जूनला मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाकडून हर्सूलकडे तिघे सुसाट निघाले होते. पोलीस निरीक्षक श्री. जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्री. भालेराव, पोलीस अंमलदार श्री. कखरे, श्री. ठाकूर यांनी कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र त्‍यांनी कार थांबविण्याऐवजी आणखीनच वेग वाढवला. त्‍यामुळे पोलिसांनी पाठलाग करून काहीच अंतरावर कार थांबवली. तिघांना कारबाहेर उतरायला सांगितले असता तिघेही दारू पिलेले होते. त्‍यांची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी कचरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software