पैठण गेटच्या अशोका लॉजमध्ये सेक्‍स रॅकेट; पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण गेट परिसरातील अशोका लॉजमध्ये पश्चिम बंगालच्या दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. बुधवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या आदेशावरून क्रांती चौक पोलिसांनी छापा मारून लॉज व्यवस्थापकासह पाच जणांना अटक केली. दोन महिलांची सुटका केली. अशी केली कारवाईपोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता बनावट ग्राहकाला एक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण गेट परिसरातील अशोका लॉजमध्ये पश्चिम बंगालच्या दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. बुधवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या आदेशावरून क्रांती चौक पोलिसांनी छापा मारून लॉज व्यवस्थापकासह पाच जणांना अटक केली. दोन महिलांची सुटका केली.

अशी केली कारवाई
पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजता बनावट ग्राहकाला एक हजार रुपये देऊन लॉजवर पाठवले होते. त्याने इशारा करताच पोलिसांनी लॉजवर हल्लाबोल केला. दोन खोल्यांमध्ये दोन महिला डांबून ठेवल्याचे दिसून आले. तीन ते पाच हजार रुपयांत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. पोलिसांनी लॉज व्यवस्थापक राजू सुभाष साळवे (वय २२, रा. नागसेन नगर), रिसेप्शनिस्ट विशाल सुरेश भुजंगे (वय ३०, रा. भीमनगर), रुमबॉय भावेश प्रवीण जाधव (वय २०, रा. रामनगर, हसूल), इरफान गफार देशमुख (वय २८, रा. बीड), कामगार संदीप भिकाजी खाजेकर (वय २४, रा. सिद्धनाथ वडगाव, गंगापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. अनेक दिवसांपासून मुख्य बाजारपेठेतील अशोका लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरू होते.

व्यापाऱ्यांत चर्चा, पण पोलिसांना कुणकुणही नव्हती…
व्यावसायिक, व्यापाऱ्यांत याबद्दल चर्चाही होती. मात्र पोलिसांना कुणकुण लागली नव्हती.अखेर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यापर्यंत माहिती गेल्यानंतर त्‍यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर कारवाई झाली. गुन्हा दाखल करताना लॉज मालकाचा उल्लेख नसल्याने लॉजचा मालक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेलच्या रूम नंबर १०४ मधून देहविक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूही जप्त करण्यात आल्या असून, संशयितांकडून ८९ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल ताब्‍यात घेतला आहे. सहायक फौजदार निवृत्ती साहेबराव गोरे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना

Latest News

बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाडळसा (ता. गंगापूर) येथे उपसरपंच अरुण सोनवणे याने साथीदारांसह मिळून सार्वजनिक बौद्ध समाजमंदिरावर बुलडोझर चालवले....
घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software