नोकरीच्या आमिषाने ८ लाखांचा गंडा; आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तुमच्या मुलाला आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून ८ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधीक्षक गणेश सोपान पाटील (रा. जामनेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. महादू रयाजी गवारे (वय ५६, रा. भरतनगर, हडको कॉर्नर, ह. मु. भक्‍तीनगर, पिसादेवी) यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : तुमच्या मुलाला आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून ८ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधीक्षक गणेश सोपान पाटील (रा. जामनेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे.

महादू रयाजी गवारे (वय ५६, रा. भरतनगर, हडको कॉर्नर, ह. मु. भक्‍तीनगर, पिसादेवी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते बजाज कंपनीतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्‍यांची ओळख गणेश पाटीलसोबत झाल्याने पाटीलने त्‍यांना तुमच्या मुलाला आरोग्य विभागात लिपिक म्‍हणून नोकरीला लावतो असे आमिष दाखवले व त्‍यासाठी ८ लाख रुपये मागितले. गवारे यांनी घर विकून, नातेवाइकांकडून उसनवारी करून, पत्‍नीचे दागिने विकून ८ लाख रुपये पाटीलला दिले. त्‍याने गवारे यांच्या मुलाची शैक्षणिक कागदपत्रे घेतली. एक महिन्यानंतर गवारे यांनी विचारणा केली असता त्‍याने प्रयत्‍न सुरू असल्याचे सांगितले. नंतर वारंवार कॉल करून विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसे परत मागितले असता तू मला दिलेले पैसे विसरून जा, मला भेटण्याचा प्रयत्‍न करू नको अन्यथा तुझ्या घरी गुंड पाठवून तुला जीवे मारेन, अशी धमकी पाटीलने दिली. अखेर गवारे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर डुकरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software