- News
- सिटी क्राईम
- धक्कादायक… १८ वर्षीय मुलीचे गुंडाकडून महिनाभरापासून लैंगिक शोषण!; कधी घरी, कधी लॉजवर नेऊन तोडतो लचके...
धक्कादायक… १८ वर्षीय मुलीचे गुंडाकडून महिनाभरापासून लैंगिक शोषण!; कधी घरी, कधी लॉजवर नेऊन तोडतो लचके, विरोध केला की आई-भावाला जीवे मारण्याच्या धमक्या देतो…!, मुकुंदवाडीतील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १८ वर्षीय मुलीचे महिनाभरापासून एका गुंडाने लैंगिक शोषण चालवल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आई व लहान भावासह राहते. आई व लहान भावाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तो कधीही मुलीला कधी स्वतःच्या घरी नेतो, तर कधी लॉजवर घेऊन जातो आणि शरीराचे लचके तोडतो… अखेर मुलीने […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १८ वर्षीय मुलीचे महिनाभरापासून एका गुंडाने लैंगिक शोषण चालवल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी आई व लहान भावासह राहते. आई व लहान भावाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तो कधीही मुलीला कधी स्वतःच्या घरी नेतो, तर कधी लॉजवर घेऊन जातो आणि शरीराचे लचके तोडतो… अखेर मुलीने हिंमत करून मुकुंदवाडी पोलिसांत येऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुकेश महेंद्र साळवे (रा. जुनी मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे.
सायलीने आईला शपथ दिली…
मुकेशने आई व भावाला मारण्याची धमकी दिलेली असल्याने सायलीने आईला शपथ देऊन बाजूला केले व दोघांना जाऊ देण्यास सांगितले. मुकेश हा सायलीला त्याच्या घरी घेऊन गेला. सायंकाळी सव्वा पाचला दोघे त्याच्या घरी गेले असता मुकेशने त्याच्या घराच्या बाजूच्या दरवाजातून तिला खोलीत नेले. तिथे तिला जबरदस्तीने चॉकलेटी कलरच्या स्ट्रीपमधील तीन गोळ्या खाऊ घातल्या. सायलीने नकार दिला असता त्याने पुन्हा तिला आई व भावाला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पूर्ण रात्र तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. सकाळी मुकेश साळवे झोपल्याचे पाहून सायली कडी उघडून घरी आली. घरी आल्यावर आईला संपूर्ण हकीकत सांगितली.
महिनाभरापासून कधीही येतो अन् घरी, लॉजवर नेतो…
मुकेश साळवे हा मागील १ महिन्यापासून आई व भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन कधी त्याच्या राहत्या घरी व हॉटेल त्रिमूर्ती (सिडको) येथे घेऊन जात जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत आहे. मुकेश साळवे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची दहशत आहे. तरुणीच्या मागे कोणी नसल्याने त्याच्या दहशतीखाली हे कुटुंब वावरत आहेत. वारंवार शारीरिक शोषण होत असल्याने अखेर सायली व तिच्या आईने हिंमत करून मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले. मुकेशला शरीरसंबंधाला नकार दिला तर तो सायली, तिची आई किंवा भाऊ यांचा जीव घेऊ शकतो, याची भीती वाटत असल्याने तिने मुकेशविरुद्ध कडक कारवाईसाठी पोलिसांना साकडे घातले आहे.

