देवगिरी कॉलेजमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी मागितले २ लाख!; मराठा पित्‍याने शेतात घेतला गळफास…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवगिरी कॉलेजमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी २ लाख रुपये मागितले… आर्थिक चणचणीतून फी कशी भरावी, या विवंचनेतून पित्‍याने गुरुवारी (२७ जून) सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना लाडसावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. मुलाला बारावीत ९२ टक्‍के गुण मिळूनही प्रवेशासाठी २ लाख रुपये मोजावे लागत आहेत. मराठ्यांना आरक्षण नसल्याने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवगिरी कॉलेजमध्ये मुलाच्या ॲडमिशनसाठी २ लाख रुपये मागितले… आर्थिक चणचणीतून फी कशी भरावी, या विवंचनेतून पित्‍याने गुरुवारी (२७ जून) सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना लाडसावंगी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. मुलाला बारावीत ९२ टक्‍के गुण मिळूनही प्रवेशासाठी २ लाख रुपये मोजावे लागत आहेत. मराठ्यांना आरक्षण नसल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे, असे मृत्‍यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पडूळ यांनी म्‍हटले आहे.

बाबासाहेब जनार्दन पडूळ (वय ४२, रा. लाडसावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लाडसावंगीत पडूळ कुटुंबाची १४ गुंठे जमीन आहे. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. पडूळ यांचा मुलगा साईने बारावी सायन्समध्ये ९२ टक्के गुण मिळवले. त्याच्या पुढील शिक्षणासाठी पडूळ रेल्वेस्टेशन रोडवरील देवगिरी कॉलेजमध्ये गेले होते. तिथे ॲडमिशनसाठी त्यांना दोन लाखांची मागणी करण्यात आली, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र नसल्याने त्यांना संपूर्ण फी भरावी लागणार होती.

जात प्रमाणपत्राच्या सर्व प्रक्रियेसाठी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली होती. त्‍यामुळे पडूळ अधिकच तणावाखाली आले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्कार करण्यात आले. पडूळ यांचा मृतदेह घाटीत रुग्णालयात सकाळी साडेनऊला आणण्यात आला. मात्र आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत पोस्टमार्टम करू देणार नाही, अशी भूमिका नातेवाइक, गावकऱ्यांनी घेत ठिय्या मांडला. घोषणाबाजी सुरू केली. दुपारपर्यंत घाटीत तणाव निर्माण झाला होता. पोस्टमार्टमनंतर सायंकाळी पावणेसातला पडूळ यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र अंकुशे यांनी छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजला सांगितले.

त्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावणार…
जातप्रमाणपत्र काढण्यासाठी तहसीलदार रमेश मुंडलोड, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी खासरापत्र, भूमिअभिलेख विभागातील नोंदी तपासण्यासाठी पडूळ यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुंडलोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाचे पदाधिकारी रमेश गायकवाड, अशोक मोरे, रेखा वहाटुळे, प्रा. चंद्रकांत भराड, विजय औताडे, सचिन मिसाळ, सुनील कोटकर यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तहसीलदार मुंडलोड, उपविभागीय अधिकारी राठोड यांनी पंचनाम्याला विलंब केला, उध्दट भाषा वापरली, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!

Latest News

टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा! टँकर चोरीला जाऊन ८ दिवस उलटल्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, तक्रारदार चकरा मारून वैतागला, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामाची न्यारी तऱ्हा!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील वृंदावन पार्कमधून पाण्याचे टँकर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ डिसेंबरला...
ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software