दुसऱ्याच्या घरात डोकावणाऱ्या महिलेच्या कानशिलात लगावली!; युवकाला १ महिन्याची शिक्षा, बीड बायपास भागात घडली होती घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपल्या घरात सुरू असलेले भांडण पाहण्यासाठी दारात आलेल्या महिलेला संतापून युवकाने कानशिलात लगावली. त्‍यामुळे महिलेने त्‍याच्याविरुद्ध मारहाण, अश्लील शिवीगाळ, विनयभंग असे आरोप लावले. या प्रकरणात सागर रमेश शिंदे (वय २५, रा. बीड बायपास) याला १ महिना सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपल्या घरात सुरू असलेले भांडण पाहण्यासाठी दारात आलेल्या महिलेला संतापून युवकाने कानशिलात लगावली. त्‍यामुळे महिलेने त्‍याच्याविरुद्ध मारहाण, अश्लील शिवीगाळ, विनयभंग असे आरोप लावले. या प्रकरणात सागर रमेश शिंदे (वय २५, रा. बीड बायपास) याला १ महिना सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांनी ठोठावली.

सागरला ठोठाविलेल्या दंडाच्या रकमेपैकी ८ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून महिलेला मिळणार आहेत. ५३ वर्षांच्या महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. २९ मे २०२० रोजी सायंकाळी साडेपाचची मारहाणीची घटना घडली होती. महिला घरात असताना शेजारी राहणाऱ्या सागरच्या घरात भांडण सुरू होते. त्यामुळे महिला महिला दरवाजात येऊन उभी राहिली. आपल्या घरातील भांडण पाहण्यासाठी उत्‍सुकता दाखविल्याबद्दल सागरचा राग अनावर झाला.

तो गाडी घेऊन महिलेच्या घरासमोर आला. त्याने महिलेला शिवीगाळ केली. तेवढ्यावरच न थांबता तिच्या कानशिलात लगावली. पोलीस उपनिरीक्षक एस. के. चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास कनून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनवाणीवेळी सहायक सरकारी वकील व्ही. एम. शेळके यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सागरला दोषी ठरवून एक महिना सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार अनिल खलाने यांनी काम पाहिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software