जरांगे पाटील, आरक्षण मिळणार आहे का?; सुसाईड नोट लिहून वाळूज MIDC त युवकाने घेतला गळफास!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आणखी एक आत्‍महत्‍या समोर आली आहे. वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे सोपान दशरथ सातपुते (वय ४०, मूळ रा. एकलेहरा, ता. गंगापूर) या कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी (३ जुलै) सायंकाळी घडली. आत्महत्येपूर्वी सोपान यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्‍यातून ही आत्‍महत्‍या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आणखी एक आत्‍महत्‍या समोर आली आहे. वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे सोपान दशरथ सातपुते (वय ४०, मूळ रा. एकलेहरा, ता. गंगापूर) या कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी (३ जुलै) सायंकाळी घडली.

आत्महत्येपूर्वी सोपान यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्‍यातून ही आत्‍महत्‍या मराठा आरक्षणासाठी झाल्याचे दिसून येते. सोपान सातपुते १० वर्षांपासून रांजणगाव शेणपुंजी येथील श्रीरामनगरात माजी उपसरपंच अशोक शेजूळ पाटील यांच्या घरात पत्नी ज्योती, मुलगा हृषिकेश व मुलगी कीर्ती यांच्यासह भाड्याने राहत होते. एका खासगी कंपनीत ते कंत्राटी कामगार होते. सायंकाळी मुलगा घरी आला असता त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्याने हंबरडा फोडला. शेजारी धावून आले. एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्‍यांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेतली.

ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. सोपान यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. त्‍यात लिहिले आहे,की जरांगे पाटील, आरक्षण मिळणार आहे का, शेतात पिकत नाही, नोकरी नाही, माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या, ज्योती मला माफ कर, नाना, दादा व दीदीला सांभाळा, तुमचाच सोपान… जय शिवराय… असा भावनिक मजकूर आहे. वाळूज एमआयडीसीत आतापर्यंत तिघांनी आत्‍महत्‍या केली आहे. यात बजाजनगरातील महेश ऊर्फ ओम मोरे (वय २०), दत्ता महिपाल (वय २६, रा. वडगाव कोल्हाटी, मूळ रा. शिंदेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) यांचा समावेश आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software