छ. संभाजीनगरात घर फोडून दागिन्यांसह ११ लाखांच्या ऐवजावर डल्ला!; घरमालक पुण्याला गेल्याची साधली संधी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरमालक पुण्याला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मोठाच डल्ला मारला. दागदागिन्यांसह ८७ हजार रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सातारा परिसरातील श्रीरामनगरात महात्मा ज्योतीबा फुले हौसिंग सोसायटीत ८ ऑगस्टच्या रात्री घडली. १३ ऑगस्टला घरमालकाच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अरुण गोपाळराव देशपांडे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरमालक पुण्याला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मोठाच डल्ला मारला. दागदागिन्यांसह ८७ हजार रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सातारा परिसरातील श्रीरामनगरात महात्मा ज्योतीबा फुले हौसिंग सोसायटीत ८ ऑगस्टच्या रात्री घडली. १३ ऑगस्टला घरमालकाच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अरुण गोपाळराव देशपांडे (वय ७१, रा. ईशसेवा, महात्मा ज्योतिबा फुले हौसिंग सोसायटी, श्रीरामनगर, सातारा परिसर) यांनी चोरीची तक्रार केली आहे. ते कॉस्मो फिल्म कंपनीत नोकरीला होते. सध्या सेवानिवृत्त आहेत. पत्नी आणि आईसह राहतात. मेहुणीची प्रकृती ठीक नसल्याने ८ ऑगस्टला ते कुटुंबीयांसह पुण्याला त्‍यांना भेटायला गेले होते. रात्री चार ते पाच चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडले. गेटवरून उडी मारून आत आले, नंतर सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडला. नंतर घरात घुसून बेडरूममधील लाकडी कपाटातील दागदागिन्यांसह ८७ हजार रुपये रोख असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना ९ ऑगस्टला दुपारी शेजारील रहिवासी सतीश देशपांडे यांनी अरुण देशपांडे यांना कळवल्यानंतर ते पुण्याहून शहरात आले व सातारा पोलिसाना कळवले. पोलिसांनी घटनास्‍थळी पाहणी करत पंचनामा केला. ठसेतज्‍ज्ञ, श्वान पथकालाही घटनास्‍थळी पाचारण केले होते. १० आॅगस्टला अरुण देशपांडे यांच्या मेहुणीचे पुण्यात निधन झाल्याने ते पोलिसांत लेखी तक्रार न करताच पुण्याला निघून गेले. अंत्यविधी, राख सावडण्याचा विधी पूर्ण करून मंगळवारी (१३ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरला परतले. त्यानंतर सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software