चोरट्यांचं नशिब फुटकं… गॅस कटरने एटीएम कापत आणले, तितक्यात आग लागली, सर्व नोटा खाक!; छत्रपती संभाजीनगरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गॅस कटरद्वारे एटीएम फोडत असताना आग लागून १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रोकड जळून खाक झाली. त्‍याचवेळी सायरन वाजायला सुरुवात झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. ही खळबळजनक घटना सोमवारी (१५ जुलै) पहाटे सव्वा चारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथे घडली. माळीवाडा येथील नाशिक मार्गावर भारतीय स्टेट बँकेची शाखा असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गॅस कटरद्वारे एटीएम फोडत असताना आग लागून १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रोकड जळून खाक झाली. त्‍याचवेळी सायरन वाजायला सुरुवात झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. ही खळबळजनक घटना सोमवारी (१५ जुलै) पहाटे सव्वा चारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथे घडली.

माळीवाडा येथील नाशिक मार्गावर भारतीय स्टेट बँकेची शाखा असून, शाखेच्या बाजूलाच एटीएम व सीडीएम मशिन आहे. बँकेकडे सुरक्षारक्षक नाहीत. पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तीन ते चार चोरटे आले. त्यांनी कार बँकेसमोर उभी केली. तोंडाला कपडा बांधलेले दोघे एटीएममध्ये शिरले व शटर बंद करून घेतले. त्यातील एकाने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. नंतर गॅस कटरने एटीएम मशिन कापायला सुरुवात केली. मशिनचा समोरचा भाग कापला गेल्यानंतर आतील भाग कापत असतानाच गॅस कटरची ठिणगी पडून एटीएममधील १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रोकड जळू लागली. एटीएममधून धूर निघू लागल्याचे एटीएम केंद्राच्या वरील मजल्यावर राहणारे हिवाळे यांना लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेचे शाखा प्रबंधक सोमनाथ सोळंके व पोलिसांना कळवले.

आजूबाजूच्या लोकांना फोन केले. त्‍याचवेळी एटीएममधील सायरन वाजू लागला. ग्रामस्थ एटीएमकडे येत असल्याचे पाहून चोरट्यांनी गॅस कटर मशिन व अन्य साहित्य तेथेच सोडून पळ काढला. चोरट्यांनी जो एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडला ताे बंदच होता. त्याच्या बाजूला दुसरा डिजिटल कॅमेरा चालू होता. त्‍यात सर्व घटना चित्रीत झाली आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक संजय गीते, रफीक पठाण, खुशाल पाटील, सुदर्शन राजपूत हे घटनास्थळी येईपर्यंत सर्व रक्‍कम जळून खाक झाली होती. त्‍यांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला. ठसे तज्‍ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या प्रकरणात शाखा व्यवस्थापक सोमनाथ सोळंके यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software