- News
- सिटी क्राईम
- चिकलठाणा पोलिसांचे चोरीवर पांघरुण!; १८ तारखेला चोरी गेलेल्या रिक्षाची तक्रारही घेईनात, उदरनिर्वाहाचे...
चिकलठाणा पोलिसांचे चोरीवर पांघरुण!; १८ तारखेला चोरी गेलेल्या रिक्षाची तक्रारही घेईनात, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावल्याने रिक्षाचालक हैराण
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे पोलीस मात्र चोऱ्यांवर पांघरूण घालण्याचा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. देवळाईच्या म्हाडा कॉलनीतून रिक्षा चोरीला गेली. त्याची तक्रार घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्यात गेलेल्या रिक्षाचालकाची तक्रारच घेण्यात आली नाही. १८ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेत अद्याप गुन्हा दाखल नाही. त्यामुळे रिक्षाचालकाने पोलीस अधीक्षक […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे पोलीस मात्र चोऱ्यांवर पांघरूण घालण्याचा प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. देवळाईच्या म्हाडा कॉलनीतून रिक्षा चोरीला गेली. त्याची तक्रार घेऊन चिकलठाणा पोलीस ठाण्यात गेलेल्या रिक्षाचालकाची तक्रारच घेण्यात आली नाही. १८ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेत अद्याप गुन्हा दाखल नाही. त्यामुळे रिक्षाचालकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन लेखी अर्ज देत उदरनिर्वाहाचे एकमेव साधलेली रिक्षा शोधून देण्यासाठी साकडे घातले आहे.
चिकलठाण्याच्या हनुमान चौकात ईश्वर आगळे हे रिक्षाचालक राहतात. त्यांच्या मालकीची एमएच २० ईएफ ४३८३ ही रिक्षा आहे. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते आपली रिक्षा देवळाईतील म्हाडा कॉलनीत त्यांच्या मित्राच्या घराजवळ उभी करत होते. १८ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास ही रिक्षा चोरीला गेली. सकाळी आठला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या मित्राने आगळे यांना कॉल करून सांगितले. त्यानंतर आगळे हे ताबडतोब मित्राच्या घराकडे गेले. दोघांनी मिळून परिसरात शोध घेतला. त्यानंतर मित्राच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले असता त्यात दोन-तीन जण रिक्षा लोटत लोटत घेऊन जाताना दिसत आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनी वारंवार तक्रारदाराला देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल सूचना केल्या आहेत. मात्र त्याकडे चिकलठाणा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. चोरीची तक्रार का घेतली जात नाही, याप्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, याबद्दल सामान्यांना प्रश्न पडला आहे. दरम्यान, ईश्वर आगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की माझी एमएच २० ईएफ ४३८३ क्रमांकाची रिक्षा कुठेही दिसून आल्यास नागरिकांनी कृपया 9175012217 या क्रमांकावर कॉल करावा.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 13:06:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...

