खळबळजनक… सिक्‍युरिटी गार्डनेच CA दाम्‍पत्‍याच्या घरात केली धाडसी चोरी!; धारदार चाकू, दोन शस्‍त्रधारी गुंड घेऊन घरात घुसला; उल्कानगरीतील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सीए दाम्‍पत्‍याच्या घरात घुसून सुरक्षारक्षकानेच दोन शस्‍त्रधारी गुंडांसोबत मिळून ३ लाखांच्या ऐवजाची लूट केली. ही खळबळजनक घटना उल्कानगरीत शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सकाळी घडली. सुदैवाने तिजोरी उघडली गेली नाही. त्‍यानंतर सुरक्षारक्षकासह त्‍याचे साथीदार शहराबाहेर पसार झाले असून, त्‍यांना लवकरच अटक करू, अशी माहिती उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी पत्रकारांना दिली. सुनील उर्फ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सीए दाम्‍पत्‍याच्या घरात घुसून सुरक्षारक्षकानेच दोन शस्‍त्रधारी गुंडांसोबत मिळून ३ लाखांच्या ऐवजाची लूट केली. ही खळबळजनक घटना उल्कानगरीत शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सकाळी घडली. सुदैवाने तिजोरी उघडली गेली नाही. त्‍यानंतर सुरक्षारक्षकासह त्‍याचे साथीदार शहराबाहेर पसार झाले असून, त्‍यांना लवकरच अटक करू, अशी माहिती उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी पत्रकारांना दिली.

सुनील उर्फ स्वदेश सर्जेराव शिंदे (वय ३०, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) लुटारू सुरक्षारक्षकाचे नाव आहे. आनंद इन्व्हेस्टमेंटचे संचालक तथा सीए ऋषिकेश कुंकुलोळ, सीए पत्नी महिमा, आई-वडील व मुलासह उल्कानगरीत राहतात. दहा महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पूजा शिंदे कामाला लागली. तिचा पती सुनीललाही कुंकुलोळ दाम्‍पत्‍याने सुरक्षा रक्षक म्हणून कामावर ठेवले. चार मजली बंगल्याखाली शिंदे दाम्‍पत्‍याची राहण्याची सोयही केली. त्‍यांच्यावर कुंकुलोळ दाम्‍पत्‍याने मोठा विश्वास ठेवला, पण या विश्वासाला सुनीलने पैशांच्या हव्यासापायी शुक्रवारी मोठाच तडा दिला. कौटुंबिक कामानिमित्त ऋषिकेश यांचे आई-वडील विदेशात गेले असून, शुक्रवारी ऋषिकेश चौथ्या मजल्यावर झोपलेले होते.

सकाळी सातला महिमा या तिसऱ्या मजल्यावर होत्या. कुंकूलोळ यांचा बंगला अद्ययावत तंत्रज्ञानाने सुरक्षित आहे. त्यांच्या परवानगीशिवाय तळमजल्यावरील दरवाजा, लिफ्टही उघडत नाही. घरकामासाठी केवळ पूजाला प्रवेश होता. ही बाब सुनीलला माहीत असल्याने त्‍याने सकाळीच आधी तळमजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. नंतर सकाळी सातला खालून बेल वाजवली. कॅमेऱ्याद्वारे सुनीलने पूजाला वर यायचे असल्याचे सांगितले. पूजाने ही बाब सांगितल्यावर महिमा यांनी अनुमती दिली. सुनील धारदार चाकू घेऊन दोन शस्त्रधारी गुंडांसह घरात घुसला. हा प्रकार पाहून महिमा घाबरून गेल्या. सुनीलने त्यांना खुर्चीवर बसवले व आरडाओरडा न करण्याची तंबी दिली. जीवे मारण्याची धमकी देत पैसे, दागिन्यांची मागणी केली. महिमा यांनी अंगावरील दागिने, मोबाइल त्याच्या हवाली केले. त्यानंतर सुनीलने तिजोरी उघडायला सांगितले.

अद्ययावत सुरक्षा असल्याने तिजोरी उघडली जाणार नाही, याचा अंदाज येताच सुनीलने महिमा यांच्या अंगावरील हिऱ्याचे लॉकेट, ७ ग्रॅमची सोनसाखळी, पांढऱ्या रंगाचा खडा असलेल्या सोन्याच्या २ अंगठ्या, आयफोन व सॅमसंग मोबाइल असा एकूण सुमारे ३ लाखांचा ऐवज घेऊन सुनील साथीदारांसह निघून गेला. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा करून सुनील व त्‍याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्‍यांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात आहे. सुनीलविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून, त्‍याची राजकीय पुढारी, पोलीस अधिकाऱ्यांत उठबस आहे. सोशल मीडियावर तो सातत्‍याने महागड्या गाड्या, नेत्‍यांसोबत फोटो पोस्ट करत असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असूनही कुंकूलोळ दाम्‍पत्‍याने त्‍याला सुरक्षेसाठी नेमल्याने आश्चर्य व्यक्‍त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software