कोंबडी विकत घेण्यासाठी आला अन्‌ अश्लील चाळे केले..!; ३८ वर्षीय महिलेची छावणी पोलिसांत तक्रार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कोंबडी विकत घेण्याच्या बहाण्याने पोल्ट्री फार्मवर आलेल्या पुरुषाने ३८ वर्षीय महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार पडेगावमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (७ ऑगस्ट) छावणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बायजीपुऱ्यात राहणाऱ्या पीडित महिलेचा पडेगावमध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. २० जुलैच्या घटनेची तक्रार तिने बुधवारी (७ ऑगस्ट) दिली आहे. तिने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कोंबडी विकत घेण्याच्या बहाण्याने पोल्ट्री फार्मवर आलेल्या पुरुषाने ३८ वर्षीय महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार पडेगावमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (७ ऑगस्ट) छावणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बायजीपुऱ्यात राहणाऱ्या पीडित महिलेचा पडेगावमध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. २० जुलैच्या घटनेची तक्रार तिने बुधवारी (७ ऑगस्ट) दिली आहे. तिने तक्रारीत म्‍हटले आहे, की २० जुलैला दुपारी एकच्या सुमारास ती कुकुटपालन व्यवसायाच्या ठिकाणी असताना एक अनोळखी व्यक्‍ती कोंबडी विकत घेण्यासाठी आला होता. त्यावेळी महिलेचे पती तिथे नव्हते. त्याचा फायदा घेऊन त्‍या व्यक्‍तीने तिचा हात धरून आतमध्ये ओढत नेले.

महिला त्याला विरोध करत असल्याने तो म्हणाला, की तुझा नवरा येथे नाही. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणून तो अश्लील चाळे करू लागला. महिलेने आरडाओरडा केला असता तिला सोडून पळून गेला. ही घटना महिलेने पतीला सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्या व्यक्‍तीचा शोध घेतला असता त्याचे नाव शरण सावळकर (रा. मीरानगर, पडेगाव) असल्याचे समजले. आजारी पडल्याने ती तक्रार देण्यासाठी येऊ शकली नाही, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी शरण सावळकरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software