कपिल पिंगळे हत्‍याकांड : मुख्य सूत्रधार रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम ठोंबरे अखेर अटकेत!, टोणगावातून आवळल्या मुसक्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील लॉज-हॉटेल व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (वय ३१, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्याकांडाचा मास्टरमाइंड रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम हरिभाऊ ठोंबरे (रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याला बेड्या ठोकण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शेंद्रा एमआयडीसीतील टोणगाव येथून शुक्रवारी (२ ऑगस्ट) रात्री त्‍याला अटक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील लॉज-हॉटेल व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (वय ३१, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्याकांडाचा मास्टरमाइंड रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम हरिभाऊ ठोंबरे (रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याला बेड्या ठोकण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शेंद्रा एमआयडीसीतील टोणगाव येथून शुक्रवारी (२ ऑगस्ट) रात्री त्‍याला अटक केली. पंधरा दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्‍याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

वाळूज एमआयडीसीतील कोट्यवधी रुपयांच्या अवैध व्यवसायाच्या वर्चस्ववादातूनच कपिलची हत्या शिवराम ठोंबरेने घडवून आणल्याचा संशय असून, या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांनी ठोंबरेच्या सांगण्यावरून हत्‍या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात सध्या जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. गोगानाथनगर, बेगमपुरा), ठोंबरेचा मेहुणा अमर ऊर्फ सोनू शिंदे (वय ३१, रा. जि. जालना), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) आणि भरत किसन पंडुरे (वय ३३, रा. बेगमपुरा), अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. हमालपुरा, जालना), अमर ऊर्फ सोनू सुरेश शिंदे (३१, रा. कार्ला, ता.जि. जालना) हे अटकेत आहेत.

का केली हत्‍या?
कपिल व यश हे पूर्वी शिवराम ठोंबरेसाठी काम करत होते. मात्र काही दिवसांपासून कपिल कानाच्या वर जाऊ लागला होता.कपिलचा परिसरातील वाढता वावर व प्रस्थ शिवरामला सहन होत नव्हते. जालन्याचे अनेक गुन्हेगार यशच्या संपर्कात असतात, याची शिवरामला कल्पना होती. बेगमपुऱ्यातील एका कथित गुंडाचा यशसोबत पूर्वीचा वाद आहे. या गुंडासोबत मिळून कपिल आपल्या दोघांना मारण्याचा कट रचत आहेत, आपला जीव धोक्यात आहे, असे शिवराम जाणूनबुजून यशला सांगू लागला. त्‍यामुळेच यश डोक्‍यात कपिलबद्दल कमालीचा राग निर्माण झाला. तू खून कर, मी पुढे पाहून घेतो, असे शिवरामने यशला सांगितले होते.

असे घडवले हत्‍याकांड
वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत १९ जुलैला पहाटे साईबाबा चौकात कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याचा मृतदेह आढळला होता. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले. कपिलसोबत यश व त्‍याच्‍या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला. विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्‍याच्‍याजवळ असलेल्या गावठी पिस्‍तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागरने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्‍तस्‍त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software