आकाश इन्स्टिट्यूटच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने विष घेतले; मराठा आंदोलकांनी क्‍लासेसची तोडफोड केली!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीडच्या माजलगाव येथील सुदर्शन दत्तात्रय तौर या तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्याने ५८ हजार रुपये शुल्क भरले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने आठ दिवसांतच हा क्लास सोडला आणि शुल्क परत मागितले. मात्र क्लासचालकाने परत देण्यास नकार दिल्याची सुसाइड नोट लिहून त्याने माजलगाव येथे राहत्या घरी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीडच्या माजलगाव येथील सुदर्शन दत्तात्रय तौर या तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्याने ५८ हजार रुपये शुल्क भरले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने आठ दिवसांतच हा क्लास सोडला आणि शुल्क परत मागितले. मात्र क्लासचालकाने परत देण्यास नकार दिल्याची सुसाइड नोट लिहून त्याने माजलगाव येथे राहत्या घरी विष घेऊन आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. सुदैवाने तो बचावला, आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे संतापलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुरुवारी (१२ सप्‍टेंबर)आकाश इन्स्टिट्यूटमध्ये घुसून तोडफोड केली. दरम्यान, तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दंगलीचा तर क्लासच्या व्यवस्थापनाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदर्शनने जेईईच्या अभ्यासासाठी आकाश इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. सुदर्शनने हे पैसे परत मिळावे म्हणून वारंवार हेलपाटे मारले. त्यामुळे त्याला वैफल्य आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सुदर्शनच्या कुटुंबीयांचीही अशीच तक्रार आहे. कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचे कळताच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हेही जिन्सी पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

कोचिंग क्लासचे ब्रँच मॅनेजर विश्वंभर कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून रमेश गायकवाड, सचिन मिसाळ, अशोक मोरे, पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, बाळासाहेब भगनुरे यांच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन महिन्यांपासून मुलगा व त्याचे नातेवाईक पैसे परत मागण्यासाठी अर्ज करत आहेत. तरीदेखील कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे तोडफोड केल्याचे आंदोलक सचिन मिसाळ यांनी पत्रकारांना सांगितले.

आकाश इन्स्टिट्यूटची सारवासारव…
आकाशवाणी चौकातील आकाश इन्स्टिट्यूटबद्दल विद्यार्थ्यांच्या पैशांसाठी छळवणूक होत असल्याच्या तक्रारी असतात. आता एका विद्यार्थ्याने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्यानंतर क्‍लासेसने सारवासारव केली आहे. रिफंड पॉलिसीनुसार १५ हजार परत देण्यास तयार होतो. ५ सप्टेंबरला आरटीजीएसने २९,८०७ रुपये पाठवले. चुकीच्या क्रमांकामुळे ते पोहोचले नाहीत, असे क्‍लासेस संचालक मंगेश आस्वार यांनी म्हटले आहे. ५८ हजार रुपये भरले असता सुरुवातीला १५ हजार आणि नंतर २९ हजार रुपये पाठवण्याचा प्रयत्‍न केल्याचे संचालक आस्वार म्हणत आहेत. यातूनच विद्यार्थ्याला झालेला मनस्ताप लक्षात येतो.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

केवळ सांगाडा उभारला, पत्रे टाकणे बाकीच, शिवाजीनगर भुयारी मार्गातून आजपासून वाहतूक सुरू, आता मध्यरात्री काम करण्याच्या सूचना

Latest News

केवळ सांगाडा उभारला, पत्रे टाकणे बाकीच, शिवाजीनगर भुयारी मार्गातून आजपासून वाहतूक सुरू, आता मध्यरात्री काम करण्याच्या सूचना केवळ सांगाडा उभारला, पत्रे टाकणे बाकीच, शिवाजीनगर भुयारी मार्गातून आजपासून वाहतूक सुरू, आता मध्यरात्री काम करण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर पत्र्याचे छत उभारण्यासाठी जागतिक बँक प्रकल्प विभागाने २६ जुलै ते ३१...
जिल्ह्यात २ भीषण अपघात  : कचनेरला ट्रक उलटून चालकाचा तर सिल्लोडजवळ उभ्या टँकरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्‍यू, शिऊरच्या तरुणावर मध्यप्रदेशात काळाचा घाला
प्रेयसीला बेल्ट, कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण!, ४ वर्षांपासून 'लिव्ह इन'मध्ये राहतात, लग्‍नाची मागणी करताच प्रियकर बनला हैवान!!, वाळूज MIDC तील धक्कादायक घटना
वाळूज एमआयडीसीत मद्यधुंद क्रूझरचालकाचा थरार, ५ वाहने उडवली, ४ शिक्षिकांसह रिक्षाचालक जखमी
व्यापारी गजानन देशमुख यांचा मुलगा इंद्रसेन बेपत्ता; स्‍कूलबस सुटल्याने पालक रागावण्याच्या भीतीने घर सोडल्याची शक्यता!, अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुंडलिकनगर पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software