आकाशच्या आत्‍महत्‍येने ऊर्जानगर हळहळले..!, तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील ऊर्जानगर येथील राजगृह हाउसिंग सोसायटीत २९ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२२ जुलै) सकाळी ८.४५ वाजता घडली. आकाश भगीरथ कांबळे (वय २९) असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आकाशचे आई-वडील सेवानिवृत्त शिक्षक […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील ऊर्जानगर येथील राजगृह हाउसिंग सोसायटीत २९ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२२ जुलै) सकाळी ८.४५ वाजता घडली. आकाश भगीरथ कांबळे (वय २९) असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आकाशचे आई-वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आकाशला एक छोटा भाऊ आहे. आकाशचा विवाह झालेला असून त्याने तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. आकाशने गळफास घेतल्याचे दिसून येताच कुटुंबीयांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

वैजापूरमध्ये तरुणाची आत्‍महत्‍या…
वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील विष्णू लक्ष्मण टेके (वय ३०) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२१ जुलै) दुपारी दीडच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. विष्णू गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात दिसल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!

Latest News

State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!! State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
ऋतुजा पाटील, मुंबई प्रतिनिधी, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊनही मीरा-भाईंदरमधील युतीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सस्पेन्स कायम आहे....
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पडेगावमध्ये मनपा ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software