छानच! जगप्रसिद्ध टोयोटा कंपनी बिडकीनमध्ये गरीब मुलांसाठी उभारणार अत्‍याधुनिक शाळा !!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जगप्रसिद्ध टोयोटा कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बिडकीन येथे गरीब मुलांसाठी शाळा उभारणीचा निर्णय घेतला असून, त्‍याचे अधिक तपशिल महिना अखेर होणाऱ्या सामंजस्य कराराच्या वेळी स्पष्ट केले जाणार आहे. यासंदर्भात आज, १८ जुलैला टोयोटा संस्थेचे जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी. एस. यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जगप्रसिद्ध टोयोटा कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बिडकीन येथे गरीब मुलांसाठी शाळा उभारणीचा निर्णय घेतला असून, त्‍याचे अधिक तपशिल महिना अखेर होणाऱ्या सामंजस्य कराराच्या वेळी स्पष्ट केले जाणार आहे.

यासंदर्भात आज, १८ जुलैला टोयोटा संस्थेचे जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी. एस. यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगिता राठोड यांची या वेळी उपस्थिती होती. झालेल्या चर्चेनुसार, टोयोटाची प्रकल्प उभारणी होत असून लवकरच आपल्या उद्योग क्षेत्रात कंपनीच्या ध्येयधोरणानुसार सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सामाजिक हिताचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यात बिडकीन येथे शाळा उभारणीचे काम ही संस्था करणार आहे. अत्याधुनिक शाळेची उभारणी या निधीतून कंपनी करून देणार आहे. त्यासाठी या महिनाअखेर जिल्हा प्रशासनाशी सामंजस्य करारही केला जाणार आहे. त्यावेळी अधिक तपशिल देण्यात येईल, असे सोनटक्के यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software