हार्वेस्टर साफ करताना चुकून वीज तारेला स्पर्श, १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, वाळूजजवळील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हार्वेस्टरची साफसफाई करत असताना वीज वाहिनीला हात लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी ९ ला वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) शिवारात घडली. ओमकार अंकुश जाधव (रा. तुर्काबाद खराडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

ओमकार त्याच्या शेतात असलेले हार्वेस्टर साफ करत होता. वरून गेलेल्या विजेच्या तारेला त्याचा हात लागला. विजेचा जोरात धक्का बसून ओमकार बेशद्ध पडला. कुटुंबीयांसह नागरिकांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरू आहे. ओमकारच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software