इंडिगोची सेवा येतेय पूर्वपदावर, उद्यापासून पुन्हा रात्रीचे मुंबई-छत्रपती संभाजीनगर विमान भरणार उड्डाण!, हैदराबाद विमान मात्र १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत रद्द

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगो विमान कंपनी सध्या संकटात आहे. या संकटातून बाहेर पडून हळूहळू कंपनी पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत असून, उद्यापासून (१४ डिसेंबर) छत्रपती संभाजीनगर-मुंबई-छत्रपती संभाजीनगर हे रात्रीचे विमान पुन्हा उड्डाण भरणार आहे. त्यामुळे मुंबईला एका दिवसात ये-जा शक्य होईल. बंगळुरू-छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू हे विमानही मंगळवापासून (१६ डिसेंबर) नेहमीप्रमाणे आठवड्यातून ३ दिवस उड्डाण घेणार आहे.

बंगळुरूसाठी इंडिगोची विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी ३ दिवस आहे. रात्रीची मुंबई विमानसेवा सुरू झाल्याने आता सकाळी आणि सायंकाळी मुंबईसाठी इंडिगोचे विमान उपलब्ध असेल. १ जानेवारीपासून इंडिगोच्या सर्व विमानसेवा सुरळीत होतील, असा दावा केला जात आहे. हैदराबादसाठीचे इंडिगोचे विमान १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑपरेशनल रिझन देत रद्द करण्यात आले आहे. मात्र सकाळची नियमित सेवा एका ७८ आसनी एटीआर विमानाद्वारे सुरू राहणार आहे. सध्या चिकलठाणा विमानतळावरून मुंबई, नवी दिल्ली, गोवा, हैदराबाद, बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software