लई भारी… आपलं विमानतळ देशात टॉप टेनमध्ये, ४.९३ रेटिंगसह ८ व्या स्थानी!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरसाठी एक गूड न्‍यूज आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने देशातील टॉप-१० विमानतळांमध्ये स्थान मिळवले आहे. देशातील ६० विमानतळांत चिकलठाणा विमानतळ आता आठव्या क्रमाकांवर आले असून, यंदा ४.९३ रेटिंग मिळाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा ०.०६ गुणांनी रेटिंगमध्ये सुधारणा केल्याने विशेष कौतुक होत आहे. एअरपोर्ट्‌स ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) ग्राहक समाधान सर्वेक्षण (सीएसएस) नुकतेच […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरसाठी एक गूड न्‍यूज आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने देशातील टॉप-१० विमानतळांमध्ये स्थान मिळवले आहे. देशातील ६० विमानतळांत चिकलठाणा विमानतळ आता आठव्या क्रमाकांवर आले असून, यंदा ४.९३ रेटिंग मिळाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा ०.०६ गुणांनी रेटिंगमध्ये सुधारणा केल्याने विशेष कौतुक होत आहे.

एअरपोर्ट्‌स ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) ग्राहक समाधान सर्वेक्षण (सीएसएस) नुकतेच केले. त्‍यातून छत्रपती संभाजीनगरचा लौकीक वाढविणारी ही कामगिरी चिकलठाणा विमानतळाने केल्याचे समोर आले. यंदा देशभरातील एकूण ६० विमानतळांचे मूल्यांकन करण्यात आले. त्‍याआधारे ५ पैकी रेटिंग देण्यात आली. उदयपूर, खजुराहो आणि भोपाळच्या विमानतळाला ५ पैकी ५ रेटिंग मिळाले आहे. २०२४ मध्ये ४.८७ रेटिंग घेऊन चिकलठाणा विमानतळ देशात १३ व्या क्रमांकावर होते. आता थेट टॉप-१० मध्ये आले. दिवसभरात १०० उड्डाणे घेण्याच्या क्षमतेचा अद्यापही वापर होत नाही. २०२५ मध्ये केलेल्या नवीन सुविधांमुळे ही कामगिरी शक्‍य झाली असून, टर्मिनल इमारतीतील सर्व ११ स्वच्छतागृहांचे नूतनीकरण केले आहे. पार्किंग क्षेत्रात ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुरुवात, लहान मुलांसाठी चाइल्ड प्ले एरिया, प्रवासी हाताळण्याची क्षमता ८०० वरून २ हजार ८५० पर्यंत वाढविल्याने ही उंची गाठता आली, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक शरद येवले यांनी पत्रकारांना सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software