Good News : अथा ग्रुप छ. संभाजीनगरच्या DMIC त करणार ५४४० कोटी रुपयांची गुंतवणूक, अडीच हजार जणांना मिळणार रोजगार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरच्या डीएमआयसीत आता ‘एनपीएसपीएल ॲडव्हान्स मटेरियल’ने (अथा ग्रुप)  लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्‍प्‍लेक्स प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी (१९ सप्‍टेंबर) या कंपनीने राज्‍य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. करारानुसार, ५ हजार ४४० कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी अथा ग्रुप करणार आहे. यामुळे अडीच हजार जणांना रोजगार मिळणार आहे. ईव्ही उद्योगांची छत्रपती संभाजीनगरलाच पहिली पसंती मिळत असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत बिडकीन औद्योगिक पट्ट्यात टोयोटा-किर्लोस्कर, एथर एनर्जी, जेएसडब्‍ल्‍यू ग्रीन मोबिलिटी या इलेक्‍ट्रीक वाहन निर्मिती उद्योगांनी ८८ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या कंपन्यांनी कारखान्यांच्या इमारतीचे बांधकामही सुरू केले असून, त्‍यांच्या उपकंपन्यांनीही ऑरिकमध्ये भूखंड घेतले आहेत. यामुळे भविष्यात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. अथा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. 

कंपन्या, गुंतवणूक आणि रोजगार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागांमध्ये महाराष्ट्र शासन आणि स्टील व सहाय्यक उद्योगासंबंधित कंपन्यांसमवेत 9 सामंजस्य करार करण्यात आले. या करारांद्वारे एकूण ₹ 80,962 कोटींची गुंतवणूक होणार असून, 90,300 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
-एनपीएसपीएल अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल(अथा ग्रुप) (छत्रपती संभाजीनगर) - गुंतवणूक ₹5440 कोटी आणि 2500 रोजगार संधी
-सुमेध टूल्स प्रा. लि. (गडचिरोली) - गुंतवणूक ₹2000 कोटी आणि 1500 रोजगार संधी  
-हरिओम पाईप्स (गडचिरोली) - गुंतवणूक ₹3135 कोटी आणि 2500 रोजगार संधी
-आयकॉन स्टील इंडिया प्रा. लि. (चंद्रपूर) - गुंतवणूक ₹850 कोटी आणि 1500 रोजगार संधी
-रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा.लि. (गडचिरोली) - गुंतवणूक ₹25,000 कोटी आणि  20,000 रोजगार संधी
-जयदीप स्टील वर्क्स इंडिया प्रायव्हेट लि. (नागपूर) - गुंतवणूक ₹1375 कोटी आणि 600 रोजगार संधी
-जी. आर. कृष्णा फेरो अलॉयज प्रा. लि. (चंद्रपूर) - गुंतवणूक ₹1482 कोटी आणि 500 रोजगार संधी
-फिल्ट्रम ऑटोकॉम्प प्रा. लि. (सातारा) - गुंतवणूक ₹100 कोटी आणि 1200 रोजगार संधी 
-जिंदाल स्टेनलेस (रायगड) - गुंतवणूक ₹41,580 कोटी आणि 60,000 रोजगार संधी.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software