- News
- उद्योग-व्यवसाय
- बिडकीनवासियांच्या ८ वर्षांच्या लढ्याला यश, DMIC कडून ‘या’ मागण्यांना मंजुरी!
बिडकीनवासियांच्या ८ वर्षांच्या लढ्याला यश, DMIC कडून ‘या’ मागण्यांना मंजुरी!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डीएमआयसी बोर्डाने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना मंजुरी दिली आहे. तशी अधिकृत माहिती डीएमआयसीकडून देण्यात आली असून, यामुळे प्रकल्पग्रस्त बिडकीन परिसरातील शेतकऱ्यांच्या आठ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मोठे यश आले आहे.
या मागण्या मान्य...
-१५ टक्के प्लॉट वाटप करताना झाडे, विहिरी आणि रस्त्यांसाठी आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क पूर्णपणे माफ केले.
-प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ७५० दिवसांची कृषी मजुरी मंजूर झाली असून, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. हा लाभ मिळणारे बिडकीनचे शेतकरी महाराष्ट्रात पहिलेच.
-प्रत्येक बाधित शेतकऱ्याला भूसंपादन मिळणार. टोयोटा, जेएसडब्ल्यू आणि अथर यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळणार. त्यासाठी बिडकीनमध्येच विशेष रोजगार मेळावा घेणार.
-औद्योगिक करातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा संबंधित ग्रामपंचायतीला देणार.
या मागण्या अद्याप अपूर्ण...
बिडकीन गावाचा रिंग रोड, बिडकीन-छत्रपती संभाजीनगर सहापदरी रस्ता आणि रेल्वे मार्ग यांसारख्या प्रश्नांसाठी संघर्ष यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्त समितीने घेतला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 08:40:24
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....

