काय सांगता, मिनिमम बॅलन्स नियमाच्या आड बँक ग्राहकांकडून वसूल केले ३५ हजार कोटी!, छ. संभाजीनगरातील अधिवेशनाच्या निमित्ताने समोर आली धक्कादायक आकडेवारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या पाचव्या संयुक्त दोन दिवसीय अधिवेशनाला छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा साहित्‍य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारपासून (१४ डिसेंबर) सुरुवात झाली. त्‍याआधी दोन्ही संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाच्या विषयाला हात घातला. बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नाही म्हणून मागील तीन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या पाचव्या संयुक्त दोन दिवसीय अधिवेशनाला छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा साहित्‍य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारपासून (१४ डिसेंबर) सुरुवात झाली. त्‍याआधी दोन्ही संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाच्या विषयाला हात घातला. बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नाही म्हणून मागील तीन वर्षांत बँकांनी ग्राहकांकडून तब्बल ३५ हजार कोटी रुपये दंड वसूल केला असून, हा दंड बंद करावा. सरकारी बँकांचे खासगीकरण करू नये या मागण्यांसंदर्भात बँक अधिकारी व कर्मचारी शासनाविरुद्ध लढत असल्याची माहिती असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.

श्री. तुळजापूरकर म्हणाले, विविध सुविधा डिजिटल झाल्याचे सांगून आवश्यक तेवढे अधिकारी व कर्मचारी बँकांना उपलब्ध करण्यात येत नाहीत. दुसरीकडे विविध योजना बँकांच्या माथी मारल्या जात आहेत. सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा डाव आहे, असा आरोपही त्‍यांनी केला. दोन दिवसीय अधिवेशनात बँकांचे खासगीकरण थांबविण्यासह बँकांचे थकीत कर्ज माफ न करता वसूल करण्यात यावे, थकीत कर्जदारांना सूट देऊ नये, बँकेचे काम कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांकडूनच करून घ्यावे, कंत्राटी कर्मचारी, बाह्यस्रोत पद्धतीने काम करून घेण्याची पद्धत बंद करावी, बँकांमध्ये पुरेशी नोकरभरती करावी आदी मागण्यांवर उहापोह होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला सरचिटणीस डी. एन. त्रिवेदी, सी. एच. वेंकटचलम, उपाध्यक्ष एन. शंकर उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software