आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत सत्तार यांनी मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी केली होती. त्यावर सिल्लोडच्या प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आ. सत्तारांसह तत्कालीन आचारसंहिता पथकप्रमुख दादराव श्रीपत अहिरे, सिल्लोड निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली आहे.

‘जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत अशा मतदारांवर ‘रामबाण उपाय’ करण्याची भाषा वापरून गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा इंतजाम केला जाईल, असे वक्तव्य आ. सत्तारांनी सभेत केले होते. या भाषणाविरोधात शंकरपेल्ली यांनी सी-विजिल (C-Vigil) ॲपद्वारे आणि सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव अहिरे यांनी सत्तार यांचा बचाव करून तक्रार फेटाळल्याचे शंकरपेल्ली यांनी म्हटले आहे. यानंतर शंकरपेल्ली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवून अपील दाखल केले. वर्षभर पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय होत नसल्याने अखेर शंकरपेल्ली यांनी सिल्लोड न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. सिल्लोड प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आ. सत्तारांसह अहिरे, पठाण आणि जिल्हाधिकारी स्वामी यांना न्यायालयात हजर होण्याचे नोटिसीद्वारे बजावले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software