दिवाळी करून माहेरी परतणारी महिला आली बसखाली!;जागीच मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दुचाकीने मुलासोबत जात असताना तोल जाऊन ४५ वर्षीय महिला बसच्या चाकाखाली आली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे शनिवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी अडीच वाजता घडली. सविता श्रीराम ज्ञाने (रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

सविता ज्ञाने दिवाळीनिमित्त माहेरी केळगावला आल्या होत्या. मुलासोबत दुचाकीने दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाल्या. तेवढ्यात सिल्लोड-मुर्डेश्वर एसटी बस (एमएच २०-बीएल १५२२) केळगाव बसस्थानकावर दोन प्रवासी उतरवून पुढे निघाली. पुढे जाण्यास जागा नसल्याने सविता यांच्या मुलाने दुचाकी जागेवर थांबविली. मात्र त्याचवेळी दुचाकी एका बाजूला झुकून सविता पडल्या आणि बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. सविता यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर घाटनांद्रा येथे शनिवारी रात्री नऊला अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग

Latest News

वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत गुरुवारी (१२ मार्च) सकाळी ८.३० च्या सुमारास केमिकलयुक्त ऑइलच्या...
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
एक लांडगा घरासमोर आला... असहायपणे उपचार करा म्हणाला, उपचार होताच जंगलात परत गेला... पुस्तकातील गोष्ट नव्हे, फर्दापूरची खरीखुरी घटना आहे!
खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software