रुग्णवाहिका थेट दुभाजकावर आदळून चालक गंभीर, बीड बायपासची दुर्घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजलगावच्या संजीवनी हॉस्पिटलमधून घाटी रुग्णालयात रुग्ण घेऊन येणारी रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटून थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात चालक गंभीर जखमी झाला. रुग्ण व रुग्णाचे नातेवाइक सुखरुप आहेत.  ही घटना बीड बायपासवरील रेणुका माता मंदिराच्या कमानीसमोर शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली.

गोवर्धन सोळुंके असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे. रुग्णवाहिकेला दुसऱ्या चारचाकी वाहनाने हुल दिल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. सातारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत

Latest News

वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत वास्तुशास्‍त्र : घराची बाल्कनी सकारात्मक उर्जेचा स्रोत
वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून घराची बाल्कनी महत्त्वाची आहे. बाल्कनी वास्तुशास्त्रानुसार बांधली गेली असेल आणि त्याची देखभाल देखील वास्तु सूचनांनुसार केली गेली असेल,...
Tech News : चुकूनही गुगलवर सर्च करू नका या ४ गोष्टी अडचणीत सापडाल, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते...
सुनील पाटील पैठणचे नवे SDPO, अवैध धंदेवाल्यांवर फास आवळणार
रक्षाबंधनासाठी घरी येताना भरधाव पिकअपची धडक, दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील दुर्घटना
लग्‍नासाठी आलेल्या पाहुण्याचा नागडोहात बुडून मृत्‍यू, कन्‍नडची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software