लग्नाच्या पत्नीला सोडून युवक विवाहित महिलेच्या प्रेमात पडला अन्‌ जिवानीशी गेला!; प्रेयसीच्या दोन मुलांनीच संपवले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

यवतमाळ (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाच्या पत्नीला सोडून युवक विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. हे अनैतिक संबंध समोर येताच महिलेच्या दोन मुलांनी मित्राला सोबत घेऊन युवकाचा खून केला. ही घटना सोमवारी (१७ मार्च) पहाटे दोनच्या सुमारास वाघापूर (जि. यवतमाळ) येथे घडली. लोहारा पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. आशिष माणिकराव सोनोने (वय ३४, रा. प्रिया रेसिडेन्सी, चौसाळा […]

यवतमाळ (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाच्या पत्नीला सोडून युवक विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. हे अनैतिक संबंध समोर येताच महिलेच्या दोन मुलांनी मित्राला सोबत घेऊन युवकाचा खून केला. ही घटना सोमवारी (१७ मार्च) पहाटे दोनच्या सुमारास वाघापूर (जि. यवतमाळ) येथे घडली. लोहारा पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आशिष माणिकराव सोनोने (वय ३४, रा. प्रिया रेसिडेन्सी, चौसाळा रोड, बोधड, जि. यवतमाळ) असे हत्‍या झालेल्याचे नाव आहे. त्याचे वाघापुरातील महिलेशी प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आशिषची पत्नी मुलीला घेऊन विभक्त राहत होती. १५ मार्च रोजी दुपारी आशिषला प्रेयसीच्या मुलाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती आशिषने त्याची आई सुनीता सोनोने यांना दिली. १७ मार्च रोजी आशिष त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत घराबाहेर निघाला.

तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. आईचे अनैतिक संबंध पाहून तिच्या मुलांना राग येत होता. अखेर त्यांचा संयम सुटला. दोघांनी आशिषला गाठून चाकूने भोसकून नंतर त्याच्यावर दगडाने प्रहार केला. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला. हल्ला होत असताना आशिषने आरडाओरडा केल्याने परिसरातील काही नागरिक मध्यरात्री २ वाजता घराबाहेर आले होते. सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम आला आहे. लोहारा पोलिसांना रात्रीच खुनाची माहिती मिळाली. त्यावरून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात दोन सख्खे भाऊ असून त्यांचे मित्र प्रशिक मुकुंदा दवणे, अंकुश डुबाजी चावरे यांचाही सहभाग आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...