- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- मोठी बातमी : शिवशाही बस-आयशरची भीषण धडक, 6 ठार, 21 जखमी; जालना – वडीगोद्री मार्गावरील दुर्घटना
मोठी बातमी : शिवशाही बस-आयशरची भीषण धडक, 6 ठार, 21 जखमी; जालना – वडीगोद्री मार्गावरील दुर्घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
जालना (सीएससीएन वृत्तसेवा ) : एसटी बस आणि आयशर वाहनाची टक्कर होऊन सहा जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी झाले. ही दुर्घटना जालना – वडीगोद्री मार्गावरील शहापूरमठ तांड्याजवळ आज, 20 सप्टेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. अपघातामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 21 जखमींपैकी सहा गंभीर असून, मृतांत […]
जालना (सीएससीएन वृत्तसेवा ) : एसटी बस आणि आयशर वाहनाची टक्कर होऊन सहा जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी झाले. ही दुर्घटना जालना – वडीगोद्री मार्गावरील शहापूरमठ तांड्याजवळ आज, 20 सप्टेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. अपघातामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 21 जखमींपैकी सहा गंभीर असून, मृतांत चारजण एसटीतील तर दोघे आयशरमधील आहेत. जखमींना आधी अंबड उपजिल्हा रुग्णालयात, नंतर जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

बसवाहक बंडू तुळशीराम बारगजे (वय 52,वडगाव ढोक, ता. गेवराई, जि.बीड) , प्रवासी राहिबाई रंगनाथ कळसाईत (वय 65, रा. मेहकर), पंचफुला भगवान सोळुंके (वय 65, रा. सुरडी) व अन्य एक प्रवासी, आयशरमधील सतीश देविदास नाईक (29, रा.मुंरादेवी, जि.अमरावती), आयशर चालक जब्बार शेख (52, मुरांदेवी, जि.अमरावती).
बसचालक गोरखनाथ लक्ष्मण खेत्रे (रा. वाहेगाव, ता. गेवराई), विजयकुमार रमेश रावत (20, उत्तराखंड), कमल रमेश रावल (40, उत्तराखंड, कलावती चिमाजी कुर्हाडे (50, रा. सुखापुरी, ता.अंबड), गणेश कचरू सिंग (36, रा. येळम, ता. शिरूर), भारत बन्सी हिंजुडे (मारकर वाडी, ता. शिरूर), प्रभाकर भाऊराव गाडेकर (55, रेवकी देवकी, ता. गेवराई जि. बीड), कमल प्रभाकर गाडेकर ( रेवकी देवकी, ता. गेवराई), कार्तिकी सतीश कुर्हाडे (तीन, रा. सुखापुरी, ता.अंबड), भारत गणेश क्षीरसागर (36, रा. शिरूर), बापूराव राधाकृष्ण निकम (53, रा. साडेगाव ता. अंबड जि. जालना), शिफा मोसिन बागवान ( 10, शहागड, ता.अंबड), अफसाना सोहेल शेख ( 34), आरशिया मोबीन बागवान (35, रा.सेल), आफीका मोबीन बागवान (13 , सेलू), युसरा सोहेल शेख (35, सेलू), ओंकार मनोज घुंगासे ( 17, साष्ट पिंपळगाव, ता. अंबड), अंजली अनिल दुधाने ( 15, साष्ट पिंपळगावड), प्रवीण अनिल सुराशे (22, अंतरवाली सराटी).
आणखी महत्त्वाच्या बातम्या
तुमचे वॉशिंग मशीन खूप वीज वापरते? वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स
By City News Desk
विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
14 Dec 2025 21:47:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...

