मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू; मराठा समाजाला केले हे मोठे आवाहन…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

जालना (अरविंद देशमुख : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज, २० जुलैला पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्‍यानंतर काहीच वेळात अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती त्‍यांनी केली. जरांगे यांनी पत्र स्वीकारले. मात्र सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण […]

जालना (अरविंद देशमुख : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज, २० जुलैला पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्‍यानंतर काहीच वेळात अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती त्‍यांनी केली. जरांगे यांनी पत्र स्वीकारले. मात्र सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारची चिंता पुन्हा वाढली आहे. यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. राज्यात कुठेही आंदोलन करून मराठा समाजाने शक्ती दाखवू नये, असे आवाहन त्यांनी केले. समाज माझ्या उपोषणाला विरोध करतो. मात्र तरीही मी त्यांच्यासाठी उपोषण करत असून, जगलो तर पुढच्या दौऱ्यावर जाणार. मेलो तर पुढचे दौरे रद्द होतील. रुग्णवाहिकेतून दौऱ्यात येणार. जिथे दौरे होणार तिथे ताकदीने तयारी करण्याचे आवाहन त्‍यांनी पत्रकारांशी बोलताना केले. मराठा समाजाला ओबीसीत सरसकट आरक्षण द्या. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही ठाम असल्याचे ते म्‍हणाले. सगेसोयऱ्याबाबतची आमची मागणी कायम असल्याचेही ते म्‍हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software