घाटीच्या अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रेंची दलाली?, काय आहे प्रकरण, या अधिकाऱ्याला निलंबित करायला हवे का?, आ. दानवे काय म्हणाले...

डॉ. सुक्रेंचा कारनामा भाग १

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयाचे वादग्रस्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला कॉल करून उमेदवारी मागे घेण्याबाबत धमकावल्याचा आरोप आ. अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले असून, डॉ. सुक्रेंना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे.

आ. दानवे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला घाटीचे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी कॉल करून कशाला पालकमंत्र्यांच्या नादी लागतोस. उमेदवारी मागे घेऊन टाक, असे म्हटले. ही बाब निवडणूक आचारसंहितेनुसार गंभीर असून, डॉ. सुक्रे यांना खरेतर बेकायदेशीरपणे नियुक्ती दिली गेली आहे.

त्यासंदर्भात महाराष्ट्रीय न्यायाधिकरणानेदेखील या बेकायदेशीर नियुक्तीची दखल घेतली आहे. डॉ. सुक्रे यांना केवळ २२ जून २०२४ पर्यंतच नियुक्त केले होते. डॉ. सुक्रे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा ठाकरे गटाकडून रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. दानवे यांनी दिला आहे. डॉक्टरांच्या वेशभूषेत राजकीय सौदेबाजी करू पाहणारे, आमच्या उमेदवारास फोन करणारे डॉ. सुक्रे पदावर कायम राहू दिल्याची परतफेड पालकमंत्र्यांची बाजू घेऊन करत असल्याचा गंभीर आरोप आ. दानवे यांनी केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...

Latest News

सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला... सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको एन ३ भागातील टेनिस कोर्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने मंगळसूत्र...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software