- News
- पॉलिटिक्स
- महापालिकेत ५ वर्षे भाजपचाच महापौर असणार : मंत्री अतुल सावे, शिंदे गटाला सोबतच ठेवणार, मंत्री शिरसाट
महापालिकेत ५ वर्षे भाजपचाच महापौर असणार : मंत्री अतुल सावे, शिंदे गटाला सोबतच ठेवणार, मंत्री शिरसाट काय म्हणाले...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेत पाच वर्षे भाजपचा महापौर असणार आहे. शिंदे गट आमचा मित्रपक्ष असल्याने त्यांना सोबतच ठेवू. शिंदे गट आमच्या सोबतच राहील. विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ‘टॉक शो'मध्ये त्यांनी शहराच्या विकासासाठी जो आराखडा दाखवला, त्यानुसारच पुढील पाच वर्षांत आम्ही काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया निवडणूक प्रमुख तथा मंत्री अतुल सावे यांनी अभूतपूर्व विजयानंतर दिली आहे.
अनपेक्षित निकालावर व्यक्त होताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, की पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, याची जबाबदारी मी स्वीकारतो. माझी मुले निवडून यावीत हे माझे टार्गेट कधीच नव्हते. पक्ष जिंकणे हे महत्त्वाचे होते. अंतर्गत राजकारण, ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला हवे होते तिथे दुर्लक्ष झाल्याचा फटका आम्हाला बसला आहे. एखाद्या वेळेस अशी लाट येते की त्याला सामोरे जावेच लागते, असे शिरसाट म्हणाले.
ठाकरे गटाचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले. मोठ्या दारुण पराभावामागे आ. अंबादास दानवे यांची अपयशी ठरलेली रणनिती कारणीभूत मानली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आ. दानवे म्हणाले, की हा पराभव जनतेच्या कौलापेक्षा सत्तेच्या आणि पैशाच्या वापराचा अधिक आहे. निवडणुकीत ‘धो-धो' पैशाचा पाऊस आणि ईव्हीएमचा घोळ करण्यात आला. भाजपच्या आकाशातून अक्षरशः पैशांची वृष्टी झाली. मतदानाच्या दिवशी १५ जानेवारीला काही ठिकाणी ईव्हीएम रिसेट झाल्याच्या आणि २५ टक्के मतदानाच्या संशयास्पद घटनांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. भाजपने त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी पक्षाला तरी संपवायला नको होते. खचून न जाता, अधिक जोमाने कामाला लागू, असे दानवे म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 13:14:02
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई

