‘दगाबाज रे'  म्हणत उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात!; हे खोटारडे सरकार, शेतकऱ्यांची थट्टा चालवलीये..., पैठणच्या नांदरमधून संवाद दौऱ्याला सुरुवात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ४ दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असून, पैठण तालुक्यातील नांदर येथून बुधवारी (५ नोव्‍हेंबर) त्यांच्या ‘दगाबाज रे' संवाद दौरा सुरू केला. हे सरकार खोटारडे असून, पीक विम्याचे २, ३ रुपये आणि ६ रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, असा घणाघात त्यांनी केला. कपाशी पिकासाठी गेल्यावर्षी ४,१०० रुपये पीक विम्याचा हप्ता भरला होता. विमा कंपनीने केवळ ८९ रुपये भरपाई जमा केली, अशी व्यथा एका शेतकऱ्याने ठाकरे यांच्याकडे मांडली. त्यावरून ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.

ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यात नेते चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, संपर्क नेते विनोद घोसाळकर, उपनेत्या ज्योती ठाकरे यांचा सहभाग आहे. नांदर येथे ठाकरे म्हणाले की, अस्मानी संकटात शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळायला पाहिजे. सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले तेव्हा दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे सांगितले होते. मात्र, दिवाळीत शेतकऱ्यांना रुपयासुद्धा मिळाला नाही. खोटे बोलणाऱ्या सरकारविरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. शेतकरी एकत्र आले तरच न्याय मिळेल. आता सरकारने ३० जूननंतर कर्जमुक्त करू असे म्हटले आहे. मात्र तोपर्यंत कर्जाचे हप्ते फेडायचे अथवा नाही, असा सवाल ठाकरे यांनी सरकारला केला. सरकारने कर्जमुक्तीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली परदेशी समिती स्वदेशी शेतकऱ्यांची वाट लावणार आरोप त्यांनी केला. ठाकरे गट कायम शेतकऱ्यांसोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software