निवडणूक विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये पकडले साडेतीन लाख रुपये !

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिका निवडणुकीत आर्थिक देवाणघेवाण टाळण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर असून, शहरात येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तपासणी केली जात आहे. शुक्रवारी (२ जानेवारी) सकाळी गोलवाडी फाट्यावर एका कारमध्ये ३ लाख ५५ हजार रुपयांची रोकड मिळून आली. कारचालक मधुकर सीताराम पवार यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे निवडणूक विभागाच्या पथकाने ही रक्कम जप्त केली.

कारच्या डॅशबोर्डमध्ये ५०० रुपयांच्या एकूण ७१० नोटा होत्या. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगणे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. पवार रकमेबाबत खुलासा करू न शकल्याने पैसे जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले. ही कारवाई पथक प्रमुख सचिन गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पथकप्रमुख मनोज चव्हाण, पोलीस अंमलदार एल. बी. इथापे, पी. बी. दायमा, व्हिडीओग्राफर नयन मगर यांनी केली. आचारसंहिता कक्ष प्रमुख सविता सोनवणे, जावेद काझी, रोहित मिसाळ, प्रभाकर गोदे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software