एमआयएमध्ये भडका!; जलीलांविरुद्ध आक्रोश, पैसे घेऊन तिकिट वाटपाचा आरोप, नासेर सिद्दीकींना डागली तोफ, हे ३१ उमेदवार..

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी २०१५ मध्ये तब्बल ६० उमेदवार देणाऱ्या एमआयएमने २४ उमेदवार निवडूनही आणले होते. नंतर एका अपक्षानेही एमआयएमला पाठिंबा दिल्याने २५ संख्याबळ झाले होते. यंदा या पक्षाने उमेदवारी देण्यातच काटकसर केली आहे. हाती आलेल्या आकड्यांनुसार केवळ ३१ उमेदवार एमआयएमने उभे केले असून, उमेदवारी देताना २१ माजी नगरसेवकांचे तिकीट कापल्याने या पक्षात अक्षरशः कोलाहल माजले आहे.

चार माजी नगरसेवकांना तिकीट मिळवताना मोठा संघर्ष करावा लागला. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधात नाराजांनी आवाज बुलंद केला आहे. त्यांनी तिकीट वाटपात जलील यांनी घोळ केल्याचा आरोप केला आहे. पैसे घेऊन तिकीट वाटले, असे म्हणत जलील यांचे फोटो फाडले, पायदळी तुडवल्याचा प्रकार गणेश कॉलनीत मंगळवारी (३० डिसेंबर) दुपारी २ ला घडला. नासेर सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात सर्वजण एकत्र आले होते. नासेर सिद्दिकी म्हणाले, की आमची शहरात ताकद आहे. मात्र तिकीटवाटपात जलील यांनी व्यापार केला.

ज्यांना तिकीट मिळाले ते आम्ही फुकटात तिकीट मिळवले नसल्याचे सांगतात. यावरून सर्व स्पष्ट होते. जलील यांनी मुंबई, धुळे येथे घोळ केले. हाच प्रकार ते शहरात करत आहेत. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेतूनही दूर करा, अशी मागणी सिद्दिकी यांनी केली. एकीकडे जलील यांच्या ‘मन्नत' निवासस्थानासमोर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा सायंकाळी ५ ला जल्लोष सुरू असताना सिद्दिकींसह अन्य माजी नगरसेवक, त्यांचे समर्थक रोष व्यक्त करताना दिसले.

हे आहेत उमेदवार...
प्रभाग १ : विजयश्री जाधव
प्रभाग २ : मानसी महेश बनकर, मोहम्मद अदनान याकुब
प्रभाग ३ : तब्बसुम बेगम जावेद इक्बाल, अंकिता विलास जगताप
प्रभाग ४ : आयशा अब्दुला खान, खान अमेर अन्वर
प्रभाग ५ : समीर साजेद बिल्डर, भाग्यश्री संजय साळवे, मीर वाजेद अली, फरजाना शेख गुलाम रसूल
प्रभाग ६ : मोहम्मद वसीम अहेमद, शेख वाजीया बेगम
प्रभाग ९ : सादीया बेगम अमजद खान, वाजेद जागिरदार
प्रभाग १२ : इरफाना बेगम इसाक हाजी, फराहात जहान अतिक
प्रभाग १३ : ओसामा कदीर मौलाना, आयशा अब्दुला हिलाबी
प्रभाग १४ : परवीन कैसर खान, मुन्शी पटेल
प्रभाग १५ : मोहम्मद जोहेब, सुमीत जमधाडे, नूरजहां बेगम
प्रभाग १६ : सोहेब कुरेशी, समीर कुरेशी, इराम सबा सय्यद सिराज
प्रभाग २८ : नसीम बेगम
प्रभाग २९ : मोनिका मोरे, नसरीन सत्तार खान, शबा नाजनीन शेख

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software