‘राष्ट्रवादी’नेही सरसावल्या बाह्या; छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबासाहेब पाटील म्हणाले, निवडणुकीत ताकद दाखवून देऊ!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मुंबईवगळता इतर शहरांत महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याची भूमिका भाजपने घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटही ‘एकला चलो रे'च्या भूमिकेत दिसत आहे. पक्षाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताकद दाखवून देईल, असे स्पष्ट केले आहे.

बाबासाहेब पाटील यांच्यावर नुकतीच जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. यानंतर त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा कार्यकर्ता संवाद मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडला. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाटील म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला ताकदीने सामोरे जायचे आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद असून हा जिल्हा नेहमीच पक्षाच्या मागे उभा राहिला आहे. दिवसेंदिवस पक्षाची व्याप्ती वाढत असून पक्षापासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा  पक्षाकडे परतत आहेत.

पुढेच नाही तर इतर पक्षातील नेते आणि पदाधिकारी ही राष्ट्रवादीत येत असल्याने पक्षाचा पसारा वाढत आहे, अशा शब्दांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. आमदार विक्रम काळे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार नितीन पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, शहराध्यक्ष अभिजीत देशमुख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अहमद अली, डॉक्टर गफार कादरी, गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुभाष सोनवणे, संतोष कोल्हे, दत्ता भांगे, अनुराग शिंदे, अकिल शेख, आप्पासाहेब पाटील, सुरेश जाधव, गजानन फुलारे, मयूर सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मेळाव्याला उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software