'मेट्रोपोलिस पोस्ट'चा अंदाज तंतोतंत खरा ठरला!; राजू वैद्य यांचा भाजपमध्ये प्रवेश, मुख्यमंत्र्यांसह, प्रदेशाध्यक्षांनी केले स्वागत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘मेट्रोपोलिस पोस्ट’ने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजू वैद्य यांनी पक्षालाही जय महाराष्ट्र ठोकत आज, २३ डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. हा सोहळा मुंबईतील भाजप कार्यालयात झाला.

राजू वैद्य यांनी ठाकरे गट सोडण्यामागचे कारण सांगितले. कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडता यावी म्हणून ठाकरे गट सोडून भाजपात आल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटात हिंदुत्ववादी भूमिका मांडणे शक्य नव्हते. त्यामुळे पक्षांतर केले, असे ते म्हणाले.  या वेळी मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आ. संजय केनेकर, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आदी उपस्थित होते. वैद्य यांच्यासोबत अक्षय खेडकर यांनीही भाजपात प्रवेश केला.

605440318_1397756855697454_73298 (1)

या पक्षप्रवेशावर आ. अंबादास दानवे यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, की परवापर्यंत राजू वैद्य आमच्यासोबत होते. अचानक काय घडलं कळायला मार्ग नाही. ते सक्षम, चांगले कार्यकर्ते आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वैद्य यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
खैरे-दानवे वादाचा परिणाम...
सातत्याने ठाकरे गटातून पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते बाहेर पडून भाजप, शिंदे गटात जात आहेत. हे सर्व आ. अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वादामुळे होत असल्याची नाराजीही हे पदाधिकारी नंतर व्यक्त करतात. आताही रशीद मामू यांचा पक्षप्रवेश आ. दानवे यांनी घडवून आणल्यानंतर खैरे विरोध करत आहेत. रशीद मामू यांच्या उमेदवारीला खैरे यांनी कट्टर विरोध दर्शवला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software